स्वातंत्र्यदिनाचा उत्साह शिगेला; कन्याशाळेत देशभक्तीचा जयघोष
1 min read

स्वातंत्र्यदिनाचा उत्साह शिगेला; कन्याशाळेत देशभक्तीचा जयघोष

Loading

 

स्वातंत्र्यदिनाचा उत्साह शिगेला; कन्याशाळेत देशभक्तीचा जयघोष

अमळनेर प्रतिनिधी
खान्देश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत आज 15 ऑगस्ट हा 80 स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाच्या , व देशभक्तीपर जल्लोषाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.,
या प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचा ध्वजारोहनाचा मान शालेय समिती चेअरमन भाऊसो जितेंद्र जैन , मुख्याध्यापिका एस एस सूर्यवंशी मॅडम ,श्री प्रविण पुरकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
या वेळी मंचवर सौ ज़ैन , उपमुख्याध्यापक एस आर शिंगाणे, श्रीमती भारती आठवले , पर्यवेक्षक एस पी वाघ , श्री शाम पवार ,शिक्षक प्रतिनिधी पी पी जोशी
होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात शालेय प्रार्थना , प्रतिज्ञा , संविधान ,वंदे मातरम् घेऊन झाली.मान्यवरांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून सलामी देऊन राष्ट्र गीत , राज्य गीत म्हणून करण्यात आली.
शाळेमध्ये विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत गायले. यावेळी गुणवंत विद्यार्थी व नुकत्याच आईस स्केटिंग हॉकी राष्ट्रीय स्तरावर डेहराडून उत्तराखंड येथे खेळलेल्या कुमारी नूतन किशोर भोई हिचा बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
आजचा दिवसाचे वातावरण हे देशभक्तीपर राष्ट्रभक्तीपर व ज्यांनी देशासाठी आपले बलिदान दिले त्यांची आठवण करून देशाला पुन्हा नवीन एका दिशेने नेण्यासाठी देशाचा सुजाण नागरिक व देशाच्या प्रगतीसाठी , व कॉपीमुक्त अभियानासाठी सर्व विद्यार्थिनींनी, शिक्षक, शिक्षिका, सर्वांनी आज प्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना क्रीडा शिक्षिका श्रीमती आर एस सोनवणे मॅडम यांनी केले. मुख्याध्यापिका सौ एस एस सूर्यवंशी मॅडम यांनी आजच्या दिवशी च्या शुभेच्छा मार्गदर्शन केले.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *