*गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडोल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*
![]()
जळगांव प्रतिनिधी
ग्रामीण उन्नती मंडळ संचलित गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल , एरंडोल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन आज सकाळी साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांकडून योग दिनानिमित्त योगासनांचे धडे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित श्री भगवती योग क्लासेस, एरंडोल च्या संचालिका देवयानी महाजन मॅडम यांनी गिरवून घेतले.वडगावकर मॅडम यांनी योग दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी श्रीमती मनीषा विश्वास भालेराव( मुख्याध्यापिका )
श्रीमती ज्योती मंदार वडगावकर(उपमुख्याध्यापिका तसेच)सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.ग्रामीण उन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री सचिन रमेश विसपुते व मुख्याध्यापिका श्रीमती अंजुषा चव्हाण यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले, तर श्रीमती आशा पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले

