वाढदिवस विशेष-समाजकारणातून राजकारणात दमदार पाऊल; नविद शेख यांचा जनसेवेचा वेगळा ठसा*
1 min read

वाढदिवस विशेष-समाजकारणातून राजकारणात दमदार पाऊल; नविद शेख यांचा जनसेवेचा वेगळा ठसा*

Loading

*समाजकारणातून राजकारणात दमदार पाऊल; नविद शेख यांचा जनसेवेचा वेगळा ठसा*

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
: सामान्य कुटुंबातून पुढे येत जनसेवेचा ध्यास घेऊन राजकारणात सक्रिय झालेल्या युवा सेनेचे नेतृत्व आणि अमळनेर नगरपरिषदेचे शिक्षण सभापती मा. नगरसेवक नविद शेख यांनी आपल्या कामाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शिक्षण क्षेत्रात त्यांनी केवळ समस्या मांडण्यापुरते न थांबता विद्यार्थ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष सोडवण्यावर भर दिला. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

प्रभाग क्र. ४ मधील ड्रेनेज व पाणीपुरवठ्यासारखे दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न तांत्रिक पातळीवर हाताळून मार्गी लावण्याचे त्यांच्या कामकाजातील कौशल्यही अधोरेखित झाले आहे.

शिक्षण संस्था, प्राचार्य व शिक्षकांशी समन्वय साधत संवादातून प्रश्न सोडवण्याची त्यांची पद्धत विशेष ठरली आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत मिळवून देत त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली आहे.

“राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे,” हे त्यांनी आपल्या कार्यातून अधोरेखित केले आहे.

तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि,
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे !
ईश्वर आपणांस दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात आपणांस हवे ते मिळो
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..

🎂💐💐💐🎂🎂🎂

— ईश्वर आर. महाजन पत्रकार
9860352960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *