पुण्यात शब्दवेल नारीशक्ती सन्मान सोहळा व राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन*
1 min read

पुण्यात शब्दवेल नारीशक्ती सन्मान सोहळा व राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन*

Loading

*पुण्यात शब्दवेल नारीशक्ती सन्मान सोहळा व राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन*

*पुणे (प्रतिनिधी)* : स्व. जिजाबाई प्रभाकरराव चरडे यांच्या स्मृतीस समर्पित “शब्दवेल नारीशक्ती सन्मान सोहळा व राज्यस्तरीय कविसंमेलन” रविवार दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:४५ वाजता निर्माण अजिंक्यतारा सोसायटी, बी बिल्डिंग 1102, सिंहगड कॉलेजजवळ, राजगड मुलांचे वसतिगृह, वडगाव बुद्रुक, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रतिभा सराफ असतील. कार्याध्यक्ष म्हणून अश्विनी अतकरे तर उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. मंदा नांदुरकर उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे (माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ), अक्षरक्रांती फाउंडेशनचे अध्यक्ष शंकर घोरसे तसेच बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावतीच्या अध्यक्षा ॲड. डॉ. नीता कचवे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल चरडे करणार आहेत.
यावेळी देवेंद्र इंगळकर यांच्या “हलूल बेटावरून” तसेच सौ. नलिनी विजय पवार यांच्या “निसर्गछाया” या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. तसेच निरंजन मार्कंडेयवार यांचा “मेमसाहब – स्त्री विषयक कवितांचा विशेष कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना शब्दवेल नारीशक्ती सन्मान पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात येणार आहेत. साहित्य, शिक्षण, वैद्यकीय, सामाजिक, कला व ग्रामीण जनजागृती अशा विविध क्षेत्रातील राज्यभरातील मान्यवर महिलांचा सन्मान केला जाणार आहे. यामध्ये ॲड. डॉ. नीता कचवे (अमरावती), डॉ. ममता इंगोले (अकोला), डॉ. संगीता बनाईत (नागपूर), ज्योती मनोहर (पुणे), वैशाली पुंडले (पनवेल), क्रांती राणे पाटील (सातारा), मंजु वणवे वानखडे (अमरावती), अनुराधा धामोडे (पालघर), सुनंदा पाटील (मुंबई), कांताबाई सोनोने (यवतमाळ), सरोज अंदनकर (नागपूर), डॉ. राणी चौधरी (अमरावती), पल्लवी उमरे (मुंबई), पल्लवी चिंचोळकर (मुंबई), अक्षता देशपांडे (पुणे), शारदा गणोरकर (अमरावती), डॉ. शुभांगी कुंभार (सातारा), जयमाला चव्हाण (सातारा), सोनाली नवले (अमरावती), मीना अशोक म्हसे (पुणे), पल्लवी वैद्य (अमरावती), रेखा साळुंखे (पुणे), रजनी ताजने (पालघर), सुषमा ढोले ठाकूर (डोंबिवली) व सीमा मंगेश घोगरे (पुणे) यांचा समावेश आहे.
यानंतर राज्यस्तरीय कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून त्याच्या अध्यक्षस्थानी शीतल राऊत राहणार आहेत. ज्योती मनोहर व प्रवीण सोनोने सूत्रसंचालन करणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रमोद काकडे, आबासाहेब कडू, सुप्रसिद्ध व्याख्याते मधुकर वारभुवन तसेच सुप्रसिद्ध कवी दिवाकर देशमुख उपस्थित राहणार आहेत.
या कविसंमेलनात राज्यभरातील ४५ कवी-कवयित्री सहभागी होणार असून यामध्ये अविनाश चरडे, प्रा. महादेव लुले, दिपाली घाडगे, श्वेता बरकडे, कांचन सावंत, सचिन बेंडभर, विशाल खोंदले, सीमा नवले, अतुल दुधाने, गजानन माद्यस्वार, पल्लवी चिंचोळकर, षा मिसाळ, भावना देशपांडे, सुनंदा पाटील, अक्षता देशपांडे, भाग्यश्री खुटाळे, विनिता कदम, राहुल शेडगे, अस्मिता इनामदार, वैभवी माने अय्यर, शैलजा शिरवाडकर, डॉ. शुभांगी कुंभार, नरेंद्र व्यवहारे, माधवी मोतलिंग, रामदास गायधने, विलास पुंडले, यश इंगळे, अनुराधा धामोडे, मीनल कांबळे, अमोल फड, आरती झोटिंग, मनिषा बोटे, अर्चना उबाळे, श्रीधर अंभुरे, वृषाली चोरे, पौर्णिमा रणपिसे, डॉ. शलाका घाडगे, वृषाली वानखडे, निलेश खडके, कार्तिकी शेटे, संजय मेश्राम व हर्षा अकर्ते, आरती नागपुरे, शबाना मुल्ला, सरोज अंदनकर यांचा सहभाग राहणार आहे.
राज्यभरातील साहित्यिक, कवी-कवयित्री, सामाजिक कार्यकर्ते व साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रवीण बोपुलकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *