जळगावात जनगणना-२०२७ प्रशिक्षण शिबिरास सुरुवात; दुसऱ्या दिवशीही मार्गदर्शन सुरू* *अधिकारी-कर्मचाऱ्यांना तांत्रिक व प्रायोगिक प्रशिक्षण*
1 min read

जळगावात जनगणना-२०२७ प्रशिक्षण शिबिरास सुरुवात; दुसऱ्या दिवशीही मार्गदर्शन सुरू* *अधिकारी-कर्मचाऱ्यांना तांत्रिक व प्रायोगिक प्रशिक्षण*

Loading

*जळगावात जनगणना-२०२७ प्रशिक्षण शिबिरास सुरुवात; दुसऱ्या दिवशीही मार्गदर्शन सुरू*
*अधिकारी-कर्मचाऱ्यांना तांत्रिक व प्रायोगिक प्रशिक्षण*

*जळगाव, दि. २४ मार्च (जिमाका):* राष्ट्रीय महत्त्वाच्या जनगणना-२०२७ मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर सुरू असून, मंगळवारी शिबिराचा दुसरा दिवसही यशस्वीरीत्या पार पडला. या प्रशिक्षण शिबिरात जिल्ह्यातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

जनगणना संचालनालयाकडील प्रशिक्षक अजय ठाकूर व विशाल दिवेकर यांनी जनगणना प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील ‘घर यादी’ व ‘घर गणना’ ही प्रक्रिया अचूक व त्रुटीविरहित पार पाडण्यासाठी प्रगणक आणि पर्यवेक्षकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

प्रशिक्षणादरम्यान जिल्ह्यातील सर्व तालुका तहसीलदार, नगरपालिका व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी, चार्ज अधिकारी, नियुक्त जनगणना कर्मचारी तसेच तांत्रिक सहाय्यक सहभागी झाले होते. क्षेत्रीय स्तरावर काम करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी, डिजिटल प्रणालीचा वापर, तसेच माहिती संकलनातील अचूकता यावर विशेष भर देण्यात आला. प्रशिक्षणामधे उपस्थितांना सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली.

जनगणना ही देशाच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा प्रशासनाने प्रशिक्षणाद्वारे मनुष्यबळ सक्षम करण्यावर भर दिला असून, पारदर्शक व कार्यक्षम पद्धतीने ही मोहीम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तीन दिवस चालणाऱ्या या शिबिरातून संबंधित यंत्रणेला अधिक सक्षम करण्याचा उद्देश प्रशासनाने ठेवला आहे. उद्या प्रशिक्षणाचा तीसरा दिवस आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *