एरंडोल येथे “कमलनाम” साहित्य मंचची स्थापना*
![]()
*एरंडोल येथे “कमलनाम” साहित्य मंचची स्थापना*
एरंडोल येथे नववर्ष गुढीपाडवा व २१ मार्च जागतिक कविता दिनाचे औचित्य साधून “कमलनाम” प्रतिष्ठान तर्फे मंचची स्थापना करण्यात आली. तसेच कमलनाम साहित्य मंच द्वारा कवी संमेलनाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.
प्रथम साहित्य मंच व कवी संमेलन बॅनरचे मा. अध्यक्ष सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघ श्री अरुण माळी साहेब यांच्या शुभ हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. तसेच नवीन कार्यकारिणी संचालक मंडळ फलकाचे अनावरण मा. श्री जगदीश भाऊ ठाकूर अध्यक्ष, नगर वाचनालय यांचे शुभ हस्ते फीत कापून जाहीर करण्यात आले. सदर कार्यक्रम सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघात कवी संमेलन घेण्यात आले. कवी संमेलनाचे अध्यक्ष मा. प्रा. वा. ना. आंधळे हे होते. दुपारी ठीक ४.०० ते ७.०० या वेळेत कवी संमेलनात २५ कवी व कवयित्री यांनी सहभाग नोंदविला व मराठी, हिंदी व अहिराणी या भाषेतून अनेक विषयांवरील कविता, गझल, भावगीते , भक्तीगीते व पोवाडे इ. सादर करून रसिक श्रोत्यांनी वाहवाह मिळवून आनंद घेतला. मा. श्री अरुण माळी, मा. श्री जगदीश ठाकूर, मा. श्री जगदीश साळी, मा. श्री कोठावदे गुरुजी, सचिव मा. श्री विनायक कुळकर्णी यांनी सुद्धा कविता सादर करून दाद मिळविली. यात प्रा. वा. ना आंधळे, श्री.पी. जी. चौधरी सर, श्री प्रवीण महाजन, श्री निंबा बडगुजर, श्री नामदेव पाटील , श्री प्रग्नेश छोटू झांबरे, प्रा. चिमकर सर, सौ. शालिनी कोठावदे, सौ. क्षमा साळी, सौ.सरिता रघुवंशी, श्रीमती. मनीषा रघुवंशी, श्रीमती पाटील बाई, मा. तिवारी ताई यांचे सह उपस्थित कवींनी कविता सादर केल्यात व अनेक रसिकश्रोत्यांनी कवितांचा मनमुराद आस्वाद घेतला.
कार्यक्रमात श्री निंबा कुंभार, श्री भिला पवार, श्री साकरलाल महाजन, श्री शिवाजी महाजन, सौ. चंद्रकला जैन, सौ. दुबे मॅडम इ. हजर होते. मा. श्री अरुण माळी साहेब, मा. श्री जगदीशभाऊ ठाकूर व मा. श्री कोठावदे गुरुजी यांनी मनोगतातून अशा साहित्य मंचाची आवश्यकता व गरज असल्याचे प्रतिपादन केले. प्रस्तावना मा. श्री वा. ना. आंधळे व प्रथम सत्राचे सूत्रसंचालन श्री पी. जी. चौधरी सर यांनी केले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन मा. श्री निंबा बडगुजर यांनी तर आभार प्रदर्शन मा. श्री विनायक कुळकर्णी यांनी केले. तसेच मंडळाचे संचालक श्री प्रग्नेश झांबरे यांनी छायाचित्रण व व्यवस्थापनाची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली. तदनंतर कार्यक्रमाची सांगता चहापाण्याने झाली. नवीन कार्यकारणी खालील प्रमाणे सर्वानुमते बिनविरोध निवडण्यात आली.
*कमलनाम साहित्य मंच कार्यकारी मंडळ.*
1. *प्रा. श्री. वा. ना. आंधळे* *(अध्यक्ष)*
2. *श्री. निंबा पुना बडगुजर* *(उपाध्यक्ष)*
3. *श्री. मनोहर आंधळे (कार्यध्यक्ष)*
4. *श्री. पी. जी. चौधरी (कोषाध्यक्ष)*
5. *श्री. विनायक गणेश कुळकणी (सचिव)*
6. श्री. अरुण देवराम माळी (संचालक)
7. श्री. प्रविण आधार महाजन (संचालक )
8. सौ. सरिता मधुकर रघुवंशी (संचालिका )
9. सौ. क्षमा साळी ( संचालिका )
10. श्री. दिनेश घुगे (संचालक)
11. श्री. प्रग्नेश छोटु झांबरे (संचालक)अशा प्रकारे कार्यकारणी मधील अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, संचालक व संचालिका इ. निवडण्यात आली.

