फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त शिक्षकांसाठी वक्तृत्व व निबंध स्पर्धा  , युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेरचा उपक्रम; आकर्षक बक्षिसांसह सहभागाचे आवाहन
1 min read

फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त शिक्षकांसाठी वक्तृत्व व निबंध स्पर्धा , युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेरचा उपक्रम; आकर्षक बक्षिसांसह सहभागाचे आवाहन

Loading

फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त शिक्षकांसाठी वक्तृत्व व निबंध स्पर्धा

युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेरचा उपक्रम; आकर्षक बक्षिसांसह सहभागाचे आवाहन

अमळनेर (प्रतिनिधी) : क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या 200 व्या जयंती वर्षानिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या औचित्य साधून ‘युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर’ तर्फे तालुक्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांसाठी वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेसाठी “महात्मा जोतीराव फुले : जीवन व कार्य” तसेच “डॉ. बाबासाहेब आंबेडकर : जीवन व कार्य” हे विषय देण्यात आले असून, इच्छेनुसार कोणताही एक किंवा दोन्ही विषय निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.

वक्तृत्व स्पर्धेसाठी एकूण 8 मिनिटांचा (6+2) वेळ देण्यात येणार आहे, तर निबंध स्पर्धेसाठी 800 ते 1000 शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. निबंध स्वहस्तलिखित स्वरूपात 10 एप्रिल 2026 पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी आकारण्यात येणार नाही.

स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून प्रथम क्रमांकासाठी 1000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 750 रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 500 रुपये अशी रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

निबंध सादर करण्यासाठी प्रा. अशोक पवार (विठ्ठल नगर), हृदयनाथ मोरे (सिद्धांत मल्टी सर्व्हिसेस) व महाराष्ट्र झेरॉक्स (प्रताप कॉलेज रोड) ही केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. स्पर्धकांनी संदर्भ पुस्तकांचा वापर करून निबंध लिहावा, गुगल अथवा रेडीमेड साहित्य टाळावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, वक्तृत्व स्पर्धा रविवार दि. 12 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजता प्रा. अशोक पवार यांच्या अभ्यासिकेत (विठ्ठल नगर, अमळनेर) पार पडणार असून, नियमावली स्पर्धेपूर्वी जाहीर केली जाणार आहे.

अधिक माहितीसाठी प्रा. राहुल निकम (9823222659), डी.ए. पाटील (8999014573) व बापूराव ठाकरे (9960209825) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *