विज्ञानाची ज्योत प्रज्वलित; साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
![]()
विज्ञानाची ज्योत प्रज्वलित; साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
अमळनेर प्रतिनिधी : साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी व्यास पिठावर ज्येष्ठ शिक्षक श्री. दिलीप पाटील सर हे अध्यक्ष होते. तसेच सौ . वैद्य मॅडम, श्री. मुकेश पाटील, विज्ञान शिक्षक श्री. डी.आर. महाजन उपस्थित होते. दिप प्रज्वलन वैज्ञानिक पद्धतीने, म्हणजेच पोटॅशियम परमॅंगनेट व ग्लिसरीनच्या मिश्रणाने करण्यात आला. सी. व्हि . रामन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. दिपक महाजन यांनी केले . त्यांनी भाषणात सी व्ही रामण यांच्या कार्याचा व संशोधनाचा परिचय करुण दिला .व आपण विज्ञानाची कास धरा हे सांगितले . ऋतुजा बावा,8 ब पुजा पाटील 9 अ अपुर्वा पाटील . 9 ब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री मुकेश पाटील व सौ. वैद्य मॅडम यांनी आपल्या भाषणात विज्ञान व त्या निमित्त मानव जातीची झालेली प्रगती ह्या विषयी आपले मनोगत व्यक्त करून वैज्ञानिक दृष्टीकोन विद्यार्थिनींमध्ये निर्माण केला. अध्यक्षिय भाषणात श्री .दिलीप पाटील सर यांनी प्रत्येक विषयात विज्ञानाची कशी सांगड आहे .हे उदाहरणा द्वारे विद्यार्थिनिंना समजून सांगितले . श्रावणी पाटील या विद्यार्थिनीने पेटता कापूर हातावर धरून तोंडात टाकून प्रयोग करून दाखवला . आपण अंधश्रद्धे पासून दूर राहा .असे सांगितले सूत्रसंचलन साक्षी मनोहर पाटील व लावण्या शिसोदे यांनी केले व आभार लावण्या शिसोदे या विद्यार्थिनीने म मानले .कार्यक्रमास शुभेच्छा संस्थेचे अध्यक्ष श्री. आबासाहेब हेमकांत पाटील व संस्थेचे सचिव श्री दादासाहेब संदीप घोरपडे यांनी दिल्या.

