डेंग्यू-मलेरियावर प्रहार; प्रभाग १६ मध्ये BSC पावडर फवारणीचा शुभारंभ नगराध्यक्षांच्या हस्ते!
1 min read

डेंग्यू-मलेरियावर प्रहार; प्रभाग १६ मध्ये BSC पावडर फवारणीचा शुभारंभ नगराध्यक्षांच्या हस्ते!

Loading

डेंग्यू-मलेरियावर प्रहार; प्रभाग १६ मध्ये BSC पावडर फवारणीचा शुभारंभ नगराध्यक्षांच्या हस्ते!

अमळनेर प्रतिनिधी :
हवामानातील बदलामुळे शहरात डासांचे प्रमाण वाढू लागल्याने डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी अमळनेर नगरपरिषदेने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतली आहे. प्रभाग क्र. १६ मध्ये BSC पावडर फवारणी मोहिमेची सुरुवात लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आली.
मा. आमदार शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत असून, नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण परिसरात फवारणी केली जाणार आहे. यावेळी नगरसेविका निलिमा पाटील, नगरसेवक महेश देशमुख तसेच आरोग्य सभापती प्रा. रामकृष्ण पाटील उपस्थित होते.
तसेच रवि पाटील, कपिल पाटील, संजय पाटील, रोहित तेले, महेश पाटील, प्रविण महाजन, विजय वाणी, किशोर सैंदाणे, विजय चौधरी, भास्कर भावसार, मुकादम समाधान केदार यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मोहिमेस मुख्याधिकारी गणेश शिंदे, आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, संतोष जाधव, संतोष माणिक यांचे विशेष सहकार्य लाभले.
नगराध्यक्ष डॉ. बाविस्कर यांनी नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवून साचलेले पाणी टाळावे, अशी सूचना करत आरोग्यविषयक उपाययोजनांमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले. शहर स्वच्छ, निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
अमळनेर शहरात प्रतिबंधात्मक आरोग्य मोहिमेची ही प्रभावी सुरुवात मानली जात असून, पुढील काही दिवसांत सर्व प्रभागांमध्ये ही फवारणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *