सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी शिवतत्व, श्रीकृष्ण तत्त्व आत्मसात करावे.. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ.रवींद्र भोळे
1 min read

सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी शिवतत्व, श्रीकृष्ण तत्त्व आत्मसात करावे.. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ.रवींद्र भोळे

Loading

सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी शिवतत्व, श्रीकृष्ण तत्त्व आत्मसात करावे.. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ.रवींद्र भोळे

पुरंदर गुरूळी ( कैलास मठ): मनुष्य जीवनभर भौतिक सुखासाठी धडपड करून मोहमाया जाल मध्ये अडकलेला असतो. आधी ,मध्य आणि अंत ह्या अवस्थांचा जीवनात विचार करत नाही. जन्म, वृद्धावस्था आणि मृत्यू या अवस्थेतून प्रत्येक मनुष्याला, प्राणीमात्राला जावं लागते. कुणीही अमरत्व घेऊन पृथ्वीतलावर आलेले नाही. म्हणून पृथ्वीवर अस्तित्व असेपर्यंत सुखी ,समाधानी आनंदी जीवन कसे जगता येईल यासाठी शिवतत्व व श्रीकृष्ण तत्त्व महत्त्वाचे आहे. म्हणजे सर्वव्यापी चैतन्य ,अंतर्गत शांती, संरक्षण आणि विनाश हे तत्व म्हणजे शिवतत्त्व आहे. तसेच भगवद्गीते मधील प्रकृती शिवात्मा, कालचक्र, कर्म आणि परमेश्वर याविषयीचे तत्त्वज्ञान समजून घेऊन कर्मयोग ,भक्तीयोग ,ज्ञानयोग, ,निष्काम कर्मयोग ,मोक्षप्राप्ती,या बाबीचा उलगडा होणे म्हणजे श्रीकृष्ण तत्त्व होय. सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी शिवतत्व आणि श्रीकृष्ण तत्त्व आत्मसात करावे असे मत ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार ह भ प डॉ.रवींद्र भोळे महाराज यांनी येथे व्यक्त केले. येथे शांताराम गिरी महाराज प्रेरणेने व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्यानिमित्ताने महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ.रवींद्र भोळे यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी त्यांनी वरील प्रतिपादन केले. डॉ. रवींद्र भोळे पुढे म्हणाले की पुरंदरची भूमी ही साधू संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेली भूमी असून अनेक सुप्रसिद्ध देवस्थाने येथे आहेत. या सर्वांचा जिर्णोद्धार करून सुधारणा झाल्यास या भागामध्ये पर्यटकांची संख्या वाढून अर्थकारण वाढू शकते. या वेळी संपत खेडेकर माजी सरपंच, परशुराम खेडेकर माजी उपसरपंच, बापू सो मार्तंड खेडेकर, परशुराम साहेबराव खेडेकर, उत्तम नामदेव खेडेकर, मधु काका खेडेकर माजी सरपंच, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे महाराज उरुळी कांचन, प्रवचनकार तानाजी खेडेकर महाराज, वसलाताई मोडक महाराज, महादेव महाराज खराडे, केरूजी महाराज चव्हाण, मुक्ताबाई चव्हाण महाराज शिवाजी भोसले महाराज यांचीही प्रवचने झाली. त्याचप्रमाणे कीर्तनकार मोहिनी ताई मुळीक महाराज बारामतीकर, गोरख सुतार महाराज आळंदी, संतोष महाराज गाडेकर भिगवन, भय्यू महाराज झेंडे दिवे, कोल्हे ताई पुरंदर, बाळकृष्ण महाराज गोगावले यांची कीर्तने झाली. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ गुरोळी, कैलास मठ, श्री शिवशंकर मंदिर भक्तगण यांनी केले. याप्रसंगी पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते सर्वांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *