अष्टविनायक नगरात भव्य शिवजन्मोत्सव सोहळा; मोफत लाठी-काठी प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
अष्टविनायक नगरात भव्य शिवजन्मोत्सव सोहळा; मोफत लाठी-काठी प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
अमळनेर प्रतिनिधी :
अष्टविनायक नगर, अमळनेर प्रस्तुत भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत लाठी-काठी प्रशिक्षण उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पारंपरिक शौर्यकलेची ओळख आणि स्वसंरक्षणाचे धडे देणारा हा उपक्रम विशेष ठरला.
या प्रशिक्षणासाठी गुरुवर्य माननीय प्रशांतजी गीते यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. लाठी-काठी हाताळण्याच्या मूलभूत तंत्रांपासून ते शारीरिक संतुलन, एकाग्रता आणि शिस्त यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
अष्टविनायक नगर परिसरातील तसेच अमळनेर शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेतला. प्रशांतजी गीते यांनी शहरातील अनेक शाळांना भेटी देत विद्यार्थ्यांना लाठी-काठी प्रशिक्षणाचे महत्त्व, त्यामागील ऐतिहासिक परंपरा आणि स्वसंरक्षणासाठी त्याची उपयुक्तता याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
दरम्यान, अष्टविनायक नगर येथे आकर्षक दरात गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या प्लॉट्सची माहिती जाणून घेण्यासाठी तालुक्यातील तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली. नियोजनबद्ध वसाहत, प्रशस्त रस्ते आणि मूलभूत सुविधांची उपलब्धता यामुळे अनेकांनी प्लॉट संदर्भात उत्सुकता दर्शविली. याबाबत आयोजक अमोलजी पाटील आणि पराग चौधरी यांनी सविस्तर माहिती दिली
.आज या भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त संध्याकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध शिवव्याख्याते निकिता पंढरीनाथ भदाणे यांचे “प्रतापगडचा महासंग्राम – अचूक वेध” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. इतिहासप्रेमी आणि शिवभक्तांसाठी हे व्याख्यान विशेष पर्वणी ठरणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
जन्मोत्सव सोहळ्याच्या माध्यमातून शौर्य, संस्कार आणि समाजजागृती यांचा सुंदर संगम साधण्याचा प्रयत्न अष्टविनायक नगरात पाहायला मिळत आहे.

