जीवनप्रकाश समाज गौरव पुरस्कार विवेक सिद्ध यांना प्रदान !*
1 min read

जीवनप्रकाश समाज गौरव पुरस्कार विवेक सिद्ध यांना प्रदान !*

Loading

*जीवनप्रकाश समाज गौरव पुरस्कार विवेक सिद्ध यांना प्रदान !*

जीवन प्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात ‘जीवनप्रकाश राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्काराने’ विवेक सिद्ध यांना सन्मानित करण्यात आले. सामाजिक स्तरावर त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला.

जीवन प्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व जीवनप्रकाश पब्लिक स्कुल व पॅरामेडिकल कॉलेज यांच्या वतीने शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. समाजातील शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक, क्रिडा , साहित्य, व्यवस्थापन आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा आढावा घेवून हा सन्मान यावेळी करण्यात आला. महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यामध्ये सहभाग होता. यावेळी आयोजक मंडळा तर्फे डॉ. प्रकाश दीपंकर यांनी सांगितले कि, “समाज हितासाठी निस्पृहपणे कार्य करणाऱ्या लोकांचा सन्मान सोहळा आम्ही यासाठी आयोजित केला आहे कि यातून समाजातील युवकांनी प्रेरणा घेवून सामाजिक कार्यासाठी पुढे यावे हा उद्देश आहे.”

या सोहळ्यासाठी राजेंद्र पाटील यड्रावकर, नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, उपनगराध्यक्ष अनुराधा आडके,डॉ.प्रा. शशिकांत कुलकर्णी, विशाल म्हतुगडे, डॉ.अभिता दीपंकर, चंद्रकला हलसवडेकर यांच्यसह संस्थेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *