अमळनेरची मान उंचावली! डॉ. दिपाली साळुंखे यांना “महाराष्ट्र बिझनेस स्टाइल आयकॉन अवॉर्ड 2025” प्रदान
![]()
अमळनेरची मान उंचावली! डॉ. दिपाली साळुंखे यांना “महाराष्ट्र बिझनेस स्टाइल आयकॉन अवॉर्ड 2025” प्रदान
अमळनेर प्रतिनिधी |
अमळनेर शहरासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी डॉ. दिपाली साळुंखे यांनी केली आहे. तेजस स्किन अँड हेअर क्लिनिक, अमळनेर यांच्या संचालिका असलेल्या डॉ. साळुंखे यांना “महाराष्ट्र बिझनेस स्टाइल आयकॉन अवॉर्ड 2025” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा मानाचा पुरस्कार दि. 27 जानेवारी 2026 रोजी नाशिक येथील गंगापूर रोडवरील सोमा वाईन्स येथे आयोजित भव्य समारंभात सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजक, व्यावसायिक व मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
त्वचारोग व केसांच्या उपचार क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, रुग्णांना दिली जाणारी दर्जेदार सेवा, तसेच सौंदर्य व आरोग्य क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम याबद्दल डॉ. दिपाली साळुंखे यांची विशेष दखल घेण्यात आली. त्यांच्या कार्यामुळे अमळनेरचे नाव राज्यपातळीवर उज्ज्वल झाले आहे.
डॉ. साळुंखे यांनी हा सन्मान आपल्या रुग्णांचा विश्वास, कुटुंबीयांचे पाठबळ आणि सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे शक्य झाल्याची भावना व्यक्त केली.
या उल्लेखनीय यशाबद्दल अमळनेर शहरासह वैद्यकीय व व्यावसायिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

