उद्या मुलांचा अभ्यास व पालक विषयावर राजीव तांबे यांचे व्याख्यान नोबेल फाउंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे आयोजन  जळगाव- पद्मश्री डॉ. भवरलाल जैन
1 min read

उद्या मुलांचा अभ्यास व पालक विषयावर राजीव तांबे यांचे व्याख्यान नोबेल फाउंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे आयोजन जळगाव- पद्मश्री डॉ. भवरलाल जैन

Loading

उद्या मुलांचा अभ्यास व पालक विषयावर राजीव तांबे यांचे व्याख्यान
नोबेल फाउंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे आयोजन

जळगाव- पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त नोबेल फाउंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नोबेल व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे. याप्रसंगी बालसाहित्य शिक्षणतज्ञ राजीव तांबे “मुलांचा अभ्यास व पालक”या विषयावर व्याख्यान देणार आहेत. सदर समारंभ दिनांक 14 डिसेंबर रविवार रोजी सकाळी दहा वाजता बस स्टॅन्ड जवळ कांताई सभागृहात संपन्न होईल.
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी सहआयुक्त कपिल पवार, राज्यकर अधिकारी राहुल पाटील, डायटचे माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड, सातपुडा ऑटोमोबाईल्स चे संचालक किरण बच्छाव, ग्लोबल मिशन इंग्लिश स्कूलचे चेअरमन मनोहर पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
याप्रसंगी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेद्वारा इसरो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कारांचे वितरण देखील करण्यात येणार आहे. मिलके चलो असोसिएशन अमळनेर, युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया जळगाव या संस्थांना राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार तर विवेकानंद प्रतिष्ठानचे उमेश इंगळे यांना डॉ. सी व्ही रमण विज्ञान शिक्षक पुरस्कार यथार्थ जनईकर वर्धा हिंगणघाट या विद्यार्थ्याला एपीजे अब्दुल कलाम बालवैज्ञानिक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तरी या प्रेरणादायी समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *