संच मान्यतेच्या दुरुस्तीसाठी अनिल बोरनारे यांचे ३६६ आमदारांना पत्र,  हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडण्याची केली विनंती
1 min read

संच मान्यतेच्या दुरुस्तीसाठी अनिल बोरनारे यांचे ३६६ आमदारांना पत्र, हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडण्याची केली विनंती

Loading

संच मान्यतेच्या दुरुस्तीसाठी अनिल बोरनारे यांचे ३६६ आमदारांना पत्र

हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडण्याची केली विनंती

मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबवणारा जाचक संचमान्यतेचा जीआर तातडीने मागे घेण्यास शासनाला भाग पाडण्यासाठी हिवाळी अधिवेशनात प्रश्न मार्गी लावण्याची मागणी मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष व मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी विधिमंडळ सदस्यांकडे केली आहे
याबाबत अनिल बोरनारे यांनी विधानसभेच्या 288 व विधान परिषदेच्या 78 आमदारांकडे लेखी पत्र पाठवून ही विनंती केली आहे
या पत्रामध्ये बोरनारे यांनी आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनासाठी सर्व आमदारांना शुभेच्छा देत
शिक्षणक्षेत्रात सध्या १५ मार्च २०२४ रोजीच्या शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयामुळे भयाचे वातावरण असून या शासन निर्णयामुळे राज्यातील शाळांमधील शेकडो वर्ग शिक्षकांविना ओस पडण्याची भीती निर्माण झाली आहे. कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत विद्यार्थी असतील पण त्यांना शिकविण्यासाठी शिक्षक राहणार नाहीत ते अतिरिक्त ठरतील. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे
विद्यार्थ्यांचे शिक्षण वाचण्यासाठी प्रत्येक विषयाला शिक्षक मिळण्यासाठी या शासन निर्णयात सुधारणा घडवून आणणे असून सभागृहामध्ये सर्व संसदीय आयुधे वापरून जाचक संचमान्यतेत सुधारणा करण्यास शासनाला भाग पाडून राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांचे शिक्षण वाचवण्याची मागणी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *