छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेच्या सरचिटणीस पदी डॉ. निलेश रेवगडे विजयी
![]()
छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेच्या सरचिटणीस पदी डॉ. निलेश रेवगडे विजयी
ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेच्या सरचिटणीस पदी झालेल्या निवडणुकीत डॉ निलेश रेवगडे प्रचंड मतांनी विजयी झाले
आज कल्याणमधील अभिनव विद्यामंदिर येथे झालेल्या छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती
संस्थेच्या अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली तर सरचिटणीस पदी डॉ निलेश रेवगडे व अनिल पांचाळ यांच्यात निवडणूक झाली या निवडणुकीत डॉ निलेश रेवगडे हे विजयी झाले
छत्रपती शिक्षण मंडळाच्या ठाणे रायगड व पालघर जिल्ह्यात ५५ शाळा असून त्यात ११ पूर्व प्राथमिक ११ प्राथमिक २७ माध्यमिक पाच कनिष्ठ महाविद्यालय व एक वरिष्ठ महाविद्यालय यांचा समावेश आहे या मंडळात एकूण 20 हजाराहून अधिक विद्यार्थी शिकत असून ६८८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काम करीत आहेत
२०२५ ते २०२८ या कालावधीत अध्यक्षपदी डॉ नंदकिशोर जोशी कोषाध्यक्ष विश्वास सोनावणे तर सरचिटणीस पदी डॉ निलेश रेवगडे यांची निवड झाली
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य व मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे अभिनव विद्यामंदिरचे मुख्याध्यापक संपत गिते अरुण आवटे यांनी शुभेच्छा दिल्या.

