सुवर्ण महोत्सवी वर्षात ‘सेकंडरी स्कूलस् एम्प्लॉईज सोसायटी’चे महामानवाला अभिवादन!
![]()
सुवर्ण महोत्सवी वर्षात ‘सेकंडरी स्कूलस् एम्प्लॉईज सोसायटी’चे महामानवाला अभिवादन!
मुंबई! (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात ‘सेकंडरी स्कूलस् एम्प्लॉईज सोसायटी’चे महामानवाला अभिवादन! महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज ‘सेकंडरी स्कूलस् एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड’तर्फे भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि आर्थिक नियोजनासाठी कटिबद्ध असलेल्या व सध्या सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या या संस्थेने राज्यभरातील आपल्या सर्व शाखांमध्ये या दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत बाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी संस्थेच्या विविध शाखांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि उपस्थित शिक्षक वर्गाने डॉ. आंबेडकरांचे विचार केवळ स्मरणात न ठेवता, ते प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा आणि त्यांचा वारसा जपण्याचा निर्धार व्यक्त केला. लोकशाही मार्गाने शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील यावेळी देण्यात आली.

