अनुभवसंपन्न आणि विश्वासू नेतृत्व पुन्हा प्रभाग 16 अ मध्ये – राजेश बापू सज्ज प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी
![]()
अनुभवसंपन्न आणि विश्वासू नेतृत्व पुन्हा प्रभाग 16 अ मध्ये – राजेश बापू सज्ज प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – प्रभाग 16 अ च्या उज्ज्वल भविष्यासाठी पुन्हा एकदा अनुभवसंपन्न आणि विश्वासू नेतृत्व पुढे आले आहे. येऊ घातलेल्या अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये माजी नगरसेवक पाटील राजेश शिवाजीराव उर्फ ‘राजेश बापू’ यांना भाजप–राष्ट्रवादी काँग्रेसचे भक्कम पाठबळ मिळाले असून, अमळनेर तालुका शहर विकास आघाडीच्या समर्थनाखाली उमेदवार म्हणून उभे आहेत.
माजी नगरसेवक म्हणून राजेश बापू यांनी प्रभागात केलेल्या ठोस कामांमध्ये
आर.के. नगर सोसायटी रस्ते–गटारांचे विकासकाम,
नवीन भालेराव नगरातील ओपन प्लेस सुशोभिकरण,
पाटील गडी परिसरात काँक्रिटीकरण,
गुरुकृपा कॉलनीतील सातत्यपूर्ण रस्त्यांचे विकासकाम,
रवी नगरमध्ये कम्युनिटी हॉल बांधणे,
तसेच 24 तास पाणीपुरवठा आणि हायमास्ट सोलर लाईट्स योजना यांचा समावेश आहे.
आगामी काळात त्यांनी प्रभागाच्या विकासासाठी ठरवलेल्या प्राथमिक कामांत


आर.के. नगर मेन गेट रस्त्याचे काँक्रिटीकरण,
गुरुकृपा–विद्याविहार–सुरभी कॉलनी रस्त्यांचे आधुनिकीकरण,
संताजी नगर रस्ते–गटारी–वीज व्यवस्थेचे सुधारणा,
आर.के. नगर ओपन प्लेस सुशोभिकरण,
मुंदडा नगर व विद्याविहार मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण,
तसेच बिघडलेले सर्व रस्ते नव्याने तयार करणे यांचा समावेश आहे.
राजेश बापू म्हणाले,
> “ही माझी उमेदवारी नाही, हा प्रभागाच्या विकासाचा संकल्प आहे. प्रभागातील प्रत्येक प्रश्न तातडीने सोडवण्याचे आणि नागरिकांना सुविधा मिळवून देण्याचे माझे उद्दिष्ट आहे.”
स्थानिक नागरिकांनी राजेश बापू यांच्यावर असलेला विश्वास व्यक्त करत सांगितले की, “राजेश बापू पुन्हा प्रचंड मतांनी विजयी होऊन प्रभागासाठी कार्य करण्यास सज्ज आहेत.”

