महात्मा फुले हायस्कूल येथे संविधान दिवस साजरा !… चित्रकला, रंगभरण, प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे संविधान दिवस साजरा !…
चित्रकला, रंगभरण, प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण !….
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर
धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून संविधान अभ्यासक एडवोकेट रवींद्र गजरे, पोलीस निरीक्षक सुनील पवार उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधान व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख अतिथींचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम शाळेतील उपशिक्षक पी डी पाटील यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. जया सोनवणे व दिव्या भोई यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व सांगितले. प्रमुख व्याख्याते रवींद्र गजरे यांनी भारतीय संविधान मूलभूत हक्क अधिकार व अनुच्छेद याविषयी विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले व संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संविधान दिन व महात्मा जोतिराव फुले स्मृतिदिन याचे औचित्य साधत शाळेत चित्रकला, रंगभरण व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य पॅड, कंपास पेटी, चित्रकला वही, रंगपेटी, पेन व प्रशस्तीपत्र चे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार यांनी पाच संविधान शाळेच्या ग्रंथालयाला मिळावे असे आवाहन करताच शाळेतील शिक्षकांनी संविधान देण्याचे कबूल केले. प्रमुख व्याख्याते रवींद्र गजरे यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले. शेवटी २६- ११ च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये निरपराध भारतीय व पोलीस दलातील शहीद जवानांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस एन कोळी तर आभार एच डी माळी यांनी मानले.

