विद्यार्थी गुणवत्ता विकासाला सर्वोच्च प्राधान्य द्या -विजय पवार गटशिक्षणाधिकारी पाचोरा* केंद्र प्रमुख सह विचार सभा संपन्न
![]()
*विद्यार्थी गुणवत्ता विकासाला सर्वोच्च प्राधान्य द्या -विजय पवार गटशिक्षणाधिकारी पाचोरा*
केंद्र प्रमुख सह विचार सभा संपन्न
पाचोरा – येथील गट साधन केंद्र येथे केंद्र प्रमुख सहविचार सभा घेण्यात आली. सदर सभेला पाचोरा गट शिक्षणाधिकारी विजय पवार,शा पो आ अधीक्षक सरोज गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील यांनी मार्गदर्शन केले. सर्व केंद्र प्रमुख, विशेष शिक्षक व शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक शिक्षक सभेला उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या संकल्पनेतून मिशन नवोदय व मिशन यश स्कॉलरशिप हे उपक्रम तालुक्यात राबवण्यासाठी आयोजित सभेला मार्गदर्शन करतांना गटशिक्षणाधिकारी पवार यांनी सांगितले की विद्यार्थी गुणवत्ता विकासाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. प्रत्येक जि प शाळेत नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग तीन नोव्हेंबर पासून सुरु करावे.स्पर्धा परीक्षा वेळापत्रक, अभ्यासक्रम नियोजन व सराव परीक्षा याबाबत चर्चा करण्यात आली.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन, शिक्षक व अधिकारी यांच्या विविध स्पर्धा याबाबत अधीक्षक सरोज गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. यूडायस मधील शिक्षक व शाळांची माहिती शंभर टक्के पूर्ण केल्याबद्दल सर्व शाळांचे अभिनंदन करण्यात आले.विकसित भारत बिल्डथॉन उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन शाळांना करण्यात आले.सभेच्या आयोजनासाठी विषय तज्ञ गिरीश भोयर, प्रोग्रामर योगेश अहिरराव, संगणक परीचालक सुनील शिवदे यांनी परिश्रम घेतले.

