“आर्या ने बांधला दिवाळीचा देखणा किल्ला!” , माजी नगराध्यक्ष सुभाष भांडारकर यांच्या परसदारी दिवाळीचा पारंपरिक सोहळा साकारला!
![]()
“आर्या ने बांधला दिवाळीचा देखणा किल्ला!”
माजी नगराध्यक्ष सुभाष भांडारकर यांच्या परसदारी दिवाळीचा पारंपरिक सोहळा साकारला!
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
दिवाळी म्हटलं की किल्ला बांधण्याची परंपरा आजही अनेकांच्या हृदयात जिवंत आहे. मातीतून, विटांतून आणि कल्पकतेतून शिवकालीन वैभव पुन्हा अनुभवण्याचा हा उत्सव असतो. अमळनेर शहरात ही सुंदर परंपरा यंदाही शाबूत ठेवलीय माजी नगराध्यक्ष सुभाष भांडारकर यांच्या नातवंडांनी.
अभिजित सुभाष भांडारकर यांची कन्या आर्या भांडारकर हिने दिवाळी निमित्ताने स्वतःच्या हातांनी एक आकर्षक, देखणा किल्ला उभारून आपली स्थापत्यकला आणि कल्पकता सादर केली आहे. हा किल्ला पाहताच शिवकालीन वैभव आणि महाराजांच्या शौर्याची आठवण ताजी होते.
या किल्ल्याच्या निर्मितीत आर्याला ओम भांडारकर यानेही हातभार लावला. दोन्ही बाल कलाकारांनी दिवसभर मनोभावे परिश्रम घेऊन हा किल्ला तयार केला.
परिणामी, भांडारकर यांच्या परसदारी उभा राहिलेला हा किल्ला परिसरातील बालगोपाल आणि नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.
“मुलांना किल्ला बांधताना त्यामागील इतिहास, शौर्य आणि परंपरेचे महत्त्व कळावे, म्हणून आम्ही त्यांना प्रवृत्त करतो,” असे माजी नगराध्यक्ष सुभाष भांडारकर व अभिजित भांडारकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
आर्या आणि ओम यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, दिवाळीच्या सणात त्यांनी आपल्या कल्पकतेने शिवभक्तीचा झेंडा पुन्हा फडकवला आहे.
“किल्ला हा केवळ मातीचा नसतो — तो संस्कृतीचा अभिमान असतो!”

