संस्थेचा सन्माननीय निर्णय — श्री. एस. डी. भिरुड सर यांची तज्ञ संचालकपदी निवड
![]()
संस्थेचा सन्माननीय निर्णय — श्री. एस. डी. भिरुड सर यांची तज्ञ संचालकपदी निवड
जळगाव (प्रतिनिधी) –
दिनांक 18 ऑक्टोबर रोजी जळगाव शिक्षक शिक्षकेतर माध्यमिक पतसंस्थेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकमुखी ठराव करून मावळते अध्यक्ष श्री. एस. डी. भिरुड सर यांची तज्ञ संचालक म्हणून निवड करण्यात आली.
श्री. भिरुड सर हे संस्थेचे अनुभवी, दूरदर्शी आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून गेल्या 11 वर्षांपासून अध्यक्षपदावर कार्यरत होते. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली पतसंस्थेची उल्लेखनीय आर्थिक प्रगती साधली गेली असून, सभासदांच्या हितासाठी अनेक निर्णय घेऊन संस्थेला स्थैर्य व विश्वासार्हता प्राप्त करून दिली.
भिरुड सरांनी कार्यकाळात पतसंस्थेच्या भव्य दोन वास्तू उभारल्या, सभासद कल्याणासाठी विविध योजना राबवल्या तसेच संस्थेच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या अनुभवाचा लाभ संस्थेच्या भावी वाटचालीसाठी व्हावा, या हेतूने त्यांची तज्ञ संचालक म्हणून एकमुखी निवड करण्यात आली आहे.
या निर्णयाचे स्वागत करताना संस्थेचे कार्यकारी सदस्य तसेच ज्येष्ठ नेते दादासाहेब श्री. यु. यु. पाटील, शिक्षक संघटनेचे नेते आप्पासाहेब संभाजी पाटील, भाऊसाहेब श्री. आर. एच. बाविस्कर, अण्णासाहेब श्री. जे. के. पाटील, श्री. एच. जी. इंगळे सर, तसेच जुक्टो संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड, ग. स. चे सोसायटीचे माजी अध्यक्ष उदय पाटील, ग. स. सोसायटीचे अध्यक्ष अजबसिंग पाटील, अजय देशमुख, सहकार गटाचे नेते आणि इतर सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
संस्थेची प्रगती आणि सभासदांचा विकास हीच आपली दिशा राहील, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
– जळगाव शिक्षक शिक्षकेतर माध्यमिक पतसंस्था

