कै.धोंडू नाऊ.ठाकरे कनिष्ठ महाविद्यालयाचा शिरपेच्यात प्रथमच राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक. कु.जीत भोईर याने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. *आमचा महाविद्यालयास क्रीडा क्षेत्रात यशाचा सुगंध देण्यासाठी आमचे क्रीडा संचालक डॉ. मनिलाल शिंपी यांची खरी मेहनत आहे:: शिक्षण महर्षी करसन ठाकरे
![]()
कै.धोंडू नाऊ.ठाकरे कनिष्ठ महाविद्यालयाचा शिरपेच्यात प्रथमच राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक.
कु.जीत भोईर याने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
*आमचा महाविद्यालयास क्रीडा क्षेत्रात यशाचा सुगंध देण्यासाठी आमचे क्रीडा संचालक डॉ. मनिलाल शिंपी यांची खरी मेहनत आहे:: शिक्षण महर्षी करसन ठाकरे*
ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कु.जीत भोईर याने सुवर्ण पदक,व कु.हर्षद चौधरी याने कांस्य पदक पटकावले असून
कु.जीत भोईर याने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेत निवड करण्यात आली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुण द्वारा अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर ,त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित, अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ च्या सहकार्याने राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा 2025/ 26 श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील विद्यालय नेवासा फाटा येथे राज्यस्तरीय कुस्ती
स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते.राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया साहेब यांचा हस्ते, अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मा.आमदार संग्राम सिंग भैय्या जगताप, त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचा अध्यक्ष ॲड.सुमतीताई घाडगे पाटील कार्यक्रमाचे मा. आमदार विठ्ठल राव लंघे पाटील, नेवासा मतदारसंघ, क्रीडा व युवक सेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य उपसंचालक श्री. युवराज नाईक यांचा मार्गदर्शनाखाली व अहिल्या नगर जिल्हा क्रीडा अधिकारी श्री ज्ञानेश्वर खुरंगे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप आप्पा भोंडवे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस हिंदकेसरी पै. योगेशभाऊ दोडके, आंतर राष्ट्रीय कुस्ती पंच शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. दिनेश गुंड, अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे सचिव प्रा. डॉ. संतोष भुजबळ यांचा नेतृत्वाखाली भव्य राज्यस्तरीय शासकीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत मुंबई विभागातील,ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील रांजनोली येथील
कै.धोंडू नाऊ ठाकरे ज्युनिअर कॉलेज चा कुस्तीवीर कु. जीत सुनील भोईर याने 63 किलो वजनी गटात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक ( प्रथम क्रमांक) मिळवत राष्ट्रीय स्पर्धेसाठी बाजी मारली आहे.राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले असून त्याची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत निवड झाली आहे. तसेच शालेय कुस्ती स्पर्धेत रांजनोली येथील
कु.हर्षद प्रवीण चौधरी (६७kg) यांन राज्यस्तरीय शासकीय शालेय कुस्ती स्पर्धेत ब्राँझ पदक पटकावले आहे.त्याबद्दल संस्थापक अध्यक्ष करसन ठाकरे,प्राचार्य सचिन ठाकरे, प्राचार्य गोरक्षनाथ तरे, प्रा. हर्षद शेटे, प्रा. दयानंद कांबळे, प्रा. आर. आर. कसबे, प्रा. मयुरेश दळवी, आय टी विभाग प्रमुख प्रा.माधव कांबळे,प्रा.मनिषा यादव, प्रा.ऐश्वर्या चव्हाण,यांच्यासह विशाल सर,सौ.सोनाली पवार,स्वाती भोईर,विनायक ढोबळे यांनी अभिनंदन केले आहे.तसेच महाविद्यालयाचे स्पोर्ट्स डायरेक्टर डॉ.मनिलाल शिंपी यांच्या मेहनतीमुळे आपल्या कॉलेज ला हे यश मिळाले आहे अशा शब्दात महाविद्यालयाचे एडमिन श्री. रुपेश तरे यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.
महाविद्यालयाचा क्रीडा क्षेत्रात यशाचे खरे मानकरी आमचे क्रीडा संचालक डॉ. मनिलाल शिंपी हेच आहेत.महाविद्यालयातील खेळामध्ये विशेष प्राविण्य मिळवण्यासाठी खऱ्या अर्थाने अतिशय कठोर मेहनत करून विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रवृत्त करून हे यश संपादन करण्यासाठी आमच्या महाविद्यालयाचे क्रीडा प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी यांची खरी मेहनत व जिद्द आहे. असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. करसन ठाकरे यांनी विशेष अभिनंदन करताना सांगितले.
उद्घाटक: माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, अहिल्यानगर, माजी आमदार संग्राम सिंग भैय्या जगताप अध्यक्ष अहिल्यानगर कुस्तीगीर संघ, एडवोकेट सुमतीताई घाडगे पाटील अध्यक्ष त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान कार्यक्रमाचे अध्यक्ष, मा. आमदार विठ्ठल राव लंघे पाटील, नेवासा मतदारसंघ, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य श्री. युवराज नाईक, अहिल्या नगर जिल्हा क्रीडा अधिकारी श्री ज्ञानेश्वर खुरंगे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप आप्पा भोंडवे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस हिंदकेसरी पै. योगेशभाऊ दोडके, आंतर राष्ट्रीय कुस्ती पंच शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. दिनेश गुंड, अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे सचिव प्रा. डॉ. संतोष भुजबळ, अहिल्यानगर विभागीय आर एस पी कमांडर सिकंदर शेख उपस्थित होते.

