1 min read

एन.एस.यु.आय राष्ट्रीय सचिव व प्रदेशाध्यक्षांचा जळगाव दौरा – १३ ऑक्टोबर रोजी ‘विद्यार्थी संवाद’ कार्यक्रम

Loading

एन.एस.यु.आय राष्ट्रीय सचिव व प्रदेशाध्यक्षांचा जळगाव दौरा – १३ ऑक्टोबर रोजी ‘विद्यार्थी संवाद’ कार्यक्रम

अमळनेर प्रतिनिधी
कॉंग्रेस पक्षाच्या विद्यार्थी आघाडीच्या संघटनेला जिल्हा स्तरावर अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने एन.एस.यु.आयचे राष्ट्रीय सचिव श्री. अक्षय यादव (क्रांतिवीर), प्रदेशाध्यक्ष श्री. सागर साळुंके व जिल्हा प्रभारी अॅड. कौस्तुभ पाटील हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

या दौऱ्याचा प्रमुख हेतू म्हणजे, जळगावसारख्या एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात एन.एस.यु.आयचे संघटन पुन्हा मजबूत करणे व विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणे हा आहे.

एन.एस.यु.आयचे पदाधिकारी जळगाव जिल्हा कॉंग्रेस कमिटी कार्यालय, शाहू नगर येथे सकाळी ११:०० वाजता आगमन करून विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसोबत ‘विद्यार्थी संवाद’ कार्यक्रमात सहभागी होतील.

यानंतर दुपारी ४:३० वाजता अमळनेर शहरात आणखी एक विद्यार्थी संवाद आयोजित करण्यात आला आहे. या संवाद सत्रांमधून विद्यार्थ्यांच्या अडचणी, शैक्षणिक प्रश्न आणि युवक नेतृत्वावर मुक्त चर्चा होणार आहे.

राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या दौऱ्याद्वारे उत्तर महाराष्ट्रात एन.एस.यु.आयचा विस्तार व नव्या पिढीपर्यंत पोहोच साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *