वारसा संविधानाचा… – स्वातंत्र्य – समता – न्याय बंधुतेचा
![]()
वारसा संविधानाचा…
– स्वातंत्र्य – समता – न्याय बंधुतेचा
धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर
धरणगाव — साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच पुरोगामी विचार जोपसणाऱ्या कष्टकरी व श्रमिकांची भूमी म्हणजेच अमळनेर नगरी. या भूमीचे भूमिपुत्र तथा आमचे वैचारिक मार्गदर्शक माननीय प्रा अशोक पवार सरांच्या प्रमुख मार्गदर्शनात “एकदिवसीय संविधान प्रशिक्षण शिबीर” धनदाई एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व धनदाई माता एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने “संविधान समजूया – संविधान पसरूया” या एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ही प्रबोधनपर गीतांचे गायन केले. त्यानंतर संविधानाचे सुनिता मोरे, अनिता संदानशिव, मिलिंद निकम, अजय भामरे, बापूराव ठाकरे, किरण चव्हाण, आर बी पाटील यांनी संविधान जागृतीविषयक गीतांचे गायन केले. या प्रशिक्षण शिबिरात डॉ राहुल निकम, संदीप घोरपडे, डॉ लीलाधर पाटील, प्रा अशोक पवार, प्राचार्य एच एम पाटील, डी ए पाटील यांनी या शिबिरात मार्गदर्शन केले. यामध्ये संत परंपरा आणि संविधान, शिबिरात संविधानाची उद्देशिका, मुलतत्वे, देशातील बिघडलेले आर्थिक धोरण, महिला – अनुसूचित जाती – अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग – अल्पसंख्यांक यांच्यासाठी असलेल्या तरतुदी, संविधान वाचवण्याची गरज आदी विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण शिबिरात कला शाखा, समजकल्याण महाविद्यालयाचे विद्यार्थी – विद्यार्थिनी तसेच वैचारिक मित्र परिवाराने उपस्थिती दिली यामध्ये धरणगाव येथून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, उद्योजक एकनाथ पाटील, कॉन्ट्रॅक्टर मोहीत पवार, व्याख्याते लक्ष्मणराव पाटील सहभागी झाले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी निखिल रांजणकर, डॉ लीलाधर पाटील, डी ए पाटील, मिलिंद निकम, बापूराव ठाकरे, सोपान भवरे आदी मान्यवरांनी परिश्रम घेतले.

