“पत्रकारांची मते वेगळी असली तरी मन एक हवे” –जेष्ठ पत्रकार डॉ. विश्वास देवकर  अमळनेर
1 min read

“पत्रकारांची मते वेगळी असली तरी मन एक हवे” –जेष्ठ पत्रकार डॉ. विश्वास देवकर अमळनेर

Loading

“पत्रकारांची मते वेगळी असली तरी मन एक हवे” –जेष्ठ पत्रकार डॉ. विश्वास देवकर

अमळनेर प्रतिनिधी :(ईश्वर महाजन)
“पत्रकारांची मते वेगळी असली तरी मन एक असले पाहिजे. पत्रकार ही एकच जात आहे, मग संघटना कितीही असल्या तरी त्या सर्वांचे उद्दिष्ट पत्रकारांचे हित जपणे आणि समाजातील सत्य समोर आणणे हेच असले पाहिजे,” असे प्रतिपादन दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार डॉ. विश्वास देवकर यांनी केले.
ते व्हाईस ऑफ मिडीयाच्या अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर परिसरात आयोजित राज्यस्तरीय दोन दिवसीय केडर कँप मध्ये बोलत होते.

पत्रकारांची खरी ताकद म्हणजे ऐक्य
डॉ. देवकर म्हणाले की,
प्रत्येक पत्रकाराची दृष्टी, मते आणि लेखनशैली वेगळी असली तरी पत्रकारितेचे मूलभूत तत्त्व एकच आहे – सत्य आणि समाजहित.
पत्रकारांची संघटना कितीही असल्या तरी पत्रकारितेची खरी जात एकच आहे आणि ती म्हणजे “सत्याचे रक्षण करणारा पत्रकार”.
जर पत्रकारांनी आपापसात भांडणे थांबवून एकतेने उभे राहिले, तर त्यांच्यावर कोणताही दबाव येऊ शकत नाही.

राज्यभरातील पत्रकारांचा सहभाग
या दोन दिवसीय कॅम्पला व्हाईस ऑफ मिडीयाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय महासचिव भोसले मॅडम, प्रदेशाध्यक्ष म्हस्के यांच्यासह राज्यातील विविध भागांतील पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन उत्कृष्ट शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.

पत्रकारांसाठी दिशादर्शक संदेश

या प्रसंगी पत्रकारांसाठी महत्त्वाचा संदेश देताना डॉ. देवकर यांनी सांगितले की,
“आज समाजात पत्रकारांवर राजकीय आणि व्यापारी दबाव वाढत आहे. अशा वेळी मतभिन्नता स्वाभाविक असली तरी पत्रकारांनी मूलभूत मूल्ये जपून एकत्र राहिले पाहिजे. पत्रकार एकत्र आले तरच चौथा स्तंभ अधिक बळकट होईल.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *