विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी रोटरी क्लब अमळनेरचा उपक्रम
1 min read

विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी रोटरी क्लब अमळनेरचा उपक्रम

Loading

विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी रोटरी क्लब अमळनेरचा उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी
रोटरी क्लब अमळनेर यांच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती जोपासावी व चांगल्या सवयी विकसित व्हाव्यात या उद्देशाने एक विशेष उपक्रम राबविण्यात आला. नवजीवन प्लस सुपर शॉपी यांच्या सहकार्याने “संकल्प – चांगला माणूस बनण्याचा” (संकल्पना व संपादन – श्री. गिरीष कुलकर्णी) हे पुस्तक विद्यार्थ्यांना भेट देण्यात आले.
या पुस्तकात मानसिक आरोग्य, संतुलित आहार, नियमित व्यायाम, सूर्यनमस्काराचे महत्त्व, वेळेचे नियोजन, एकाग्रता, अभ्यासाच्या पद्धती, करिअर निवड, डोळ्यांची निगा, दातांची काळजी, पर्यावरणपूरक जीवनशैली, भूजल पुनर्भरण आदी महत्त्वाचे विषय समाविष्ट आहेत. विद्यार्थ्यांना या पुस्तिकेवर आधारित प्रश्नावली देण्यात येणार असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोटरी क्लबकडून आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना दिला संदेश
“तुमच्यात ऊर्जा, संकल्पना व माणुसकी आहे. योग्य दिशेने वापर झाल्यास ती खरी शक्ती ठरते. चांगला माणूस होणे म्हणजे फक्त चांगल्या सवयी नव्हे तर चांगले मन व चांगले विचार असणे होय. सुसंवादी समाज निर्माण झाला कीच मजबूत राष्ट्राचा पाया रचला जातो,” असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

🔹 रोटरीची चार प्रश्नांची चाचणीही विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आली :
1️⃣ ते सत्य आहे का?
2️⃣ ते सर्व संबंधांसाठी न्याय्य आहे का?
3️⃣ ते स्नेह व भावना वाढवणारे आहे का?
4️⃣ ते सर्व संबंधितांच्या हिताचे आहे का?
या उपक्रमात नवजीवन प्लस सुपर शॉपी अमळनेर चे भागीदार श्री. निखिल जैन यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच दौरा कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व साने गुरुजी विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य लाभले
शिक्षक दिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षकांना रोटरी क्लबच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
हा उपक्रम आज सकाळी ९ वाजता अमळनेर शहरातील विविध शाळांमध्ये राबविण्यात आला. रो. देवेंद्र कोठारी, रो. आशिष चौधरी, प्रोजेक्ट चेअरमन रो. अभिजीत भांडारकर व रो. दिलीप भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *