झांबरे विद्यालयात मोदक मेकिंग प्रेझेंटेशन स्पर्धा* *ज्वारीच्या उकडीच्या मोदकाने पटकावला प्रथम क्रमांक*
1 min read

झांबरे विद्यालयात मोदक मेकिंग प्रेझेंटेशन स्पर्धा* *ज्वारीच्या उकडीच्या मोदकाने पटकावला प्रथम क्रमांक*

Loading

*झांबरे विद्यालयात मोदक मेकिंग प्रेझेंटेशन स्पर्धा*
*ज्वारीच्या उकडीच्या मोदकाने पटकावला प्रथम क्रमांक*

 

जळगांव प्रतिनिधी

के.सी.ई.सोसायटी संचलित ए .टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोदक स्पर्धा आयोजित केली . सदर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला .विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या फ्लेवर्सचे व आकाराचे मोदक बनवून त्यांचे खूप सुंदर सादरीकरण केले. सदर स्पर्धेमध्ये ज्वारीपासून बनवलेल्या उकडीचा मोदक नाविन्यपूर्ण ठरला व असा छान मोदक बनवण्यासाठी इयत्ता दहावीचा विद्यार्थी प्रेम निलेश पाटील याने प्रथम क्रमांक मिळवला व परीक्षकांची शाबासकीची थाप व कौतुक मिळविले.

स्पर्धेत जान्हवी नेमाडे नववी क ची विद्यार्थिनी हिने पान फ्लेवरचा मोदक बनवून द्वितीय क्रमांक मिळवला तसेच दिशा पाटील नववीची विद्यार्थिनी हिने ओरिओ बिस्कीट चा मोदक बनवून तृतीय क्रमांक मिळविला दुर्गेश वडनेरे आणि वैष्णवी भार्गव यांनी अनुक्रमे उत्तेजनार्थ प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळविला.
सदर स्पर्धेचे परीक्षण मोदक स्पेशालिस्ट श्रीमती. सुनिता वागले यांनी केले. त्यांनी मोदकांच्या सादरीकरण आणि चवीचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच भविष्यातील अशा स्पर्धांसाठी खूप मोलाचे मार्गदर्शन केले.
सदर स्पर्धेत स्नेहल पाटील, कोमल देवरे ,श्रुती पाटील या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. मोदक स्पर्धेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. प्रणिता झांबरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले स्पर्धेचे आयोजन श्री चंद्रकांत कोळी सर यांनी केले स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सौ ज्योती पाचपांडे व सौ रोशनी कोळी यांनी परिश्रम घेतले.

 

फोटो कँप्शन

गणेशोत्सवानिमित्त आयोजित मोदक प्रेझेंटेशन स्पर्धेत सहभागी विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक आणि परीक्षक सुनीता मॅडम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *