सणासुधीसाठी वेतना संदर्भात समन्वय समितीच्या मागणीला यश.
1 min read

सणासुधीसाठी वेतना संदर्भात समन्वय समितीच्या मागणीला यश.

Loading

सणासुधीसाठी वेतना संदर्भात समन्वय समितीच्या मागणीला यश.

जळगांव प्रतिनिधी

सणासुदीच्या तयारीला सुलभता यावी, सण उत्सव अधिकाधिक चांगल्या पद्धतीने साजरे करता यावेत यासाठी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब, जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांना निवेदन दिलेले होते त्यानुसार लागलीच शासन स्तरावरून राज्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतन अदा करणे संदर्भात राज्य शासनाने निर्णय घेतला त्यानुरूप दिनांक २६/८/२०२५ मंगळवार रोजी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन पगाराच्या खात्यावर जमा करण्यात आले या संदर्भात कृतज्ञतापूर्वक मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब, जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार, अप्पर कोषागार अधिकारी सुभाष गुंजाळ, माध्यमिक विभागाचे वेतन पथक अधीक्षक रियाज तडवी, अनिल सोनवणे, ज्ञानेश्वर चौधरी, कोषागार कार्यालयातील सुजित कासार भाऊसाहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानण्यात आले. याप्रसंगी जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीचे मार्गदर्शक डॉ.मिलिंद बागुल, समन्वयक तुळशीराम सोनवणे, उपाध्यक्ष आर एस पाटील, सुभाष न्हाळदे, संतोष कचरे, प्रेम झंवर, पांडुरंग पवार, स्वप्निल पाटील, अरुण कुमार बाविस्कर, रतिलाल पाटील, रवींद्र कोळी , सागर हिवराळे, पी ए पाटील, शशिकांत राणेराजपूत, प्रवीण धनगर, अनिल मनुरे, अशोक सपकाळे, अनिल चव्हाण, अनिल अहिरे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *