“असोदा सार्वजनिक विद्यालयात गीत-नृत्य, मनोगतातून गुंजली ‘बहिणाईची वाणी’”
![]()
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना जयंती निमित्त सार्वजनिक विद्यालयात अभिवादन .
असोदा गावाचं भूषण मानल्या जाणाऱ्या, जीवनाचं सारं सांगणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांना सार्वजनिक विद्यालय असोदा येथे त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमातून उजाळा देत अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिन जंगले यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मनोगत व्यक्त केले.गावातील शेतकरी जनार्दन चौधरी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी व सरस्वतीला पुष्पहार अर्पण करून पूजन केले
प्रीती पाटील ,नूतन वाणी यांनी बहिणाबाई विषयी माहिती सांगितली तसेच हेतल कोल्हे व तिच्या मैत्रिणी आणि सिद्धार्थ कापडणे यांनी बहिणाबाईची गाणी म्हटली. विशाखा भोळे आणि तिच्या मैत्रिणी यांनी “अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर” या बहिणाबाईंच्या गाण्यावर नृत्य सादर करतांना नृत्याद्वारे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून बहिणाबाईंच्या जीवनाचा सार सांगितला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल यांनी बहिणाबाई निरक्षर होत्या तरी त्यांनी जीवनाला एक दिशा दाखवली हे आपल्या मनोगतातून सांगितले. पर्यवेक्षक लालसिंग पाटील ,मंगला नारखेडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना चौधरी तर आभार शुभांगीनी महाजन यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांचे सहकार्य लाभले.

