“नंदादीप विद्यालयात स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा”
![]()
“नंदादीप विद्यालयात स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा”
अमळनेर प्रतिनिधी
नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब ता. अमळनेर येथे” स्वातंत्र्य दिन ” खूप आनंद आणि उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम सकाळी सर्व विद्यार्थी ,विद्यार्थिनी आणि सर्व शिक्षक वृंद यांनी निंब गावात प्रभात फेरी काढली. सर्व गाव स्वातंत्र्य दिनाच्या जयघोषाने दुमदुमून गेले. विद्यालयाच्या प्रांगणात विद्यालयाचे अध्यक्ष आणि अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे सरकारी वकील ॲड. आबासाहेब श्री. राजेंद्र भगवान चौधरी यांनी भारत मातेच्या प्रतिमेचे वंदन करून ध्वजारोहण केले.यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरीक,माजी विद्यार्थी आणि शाळेचे पदाधिकारी , मुख्याध्यापक, सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहण नंतर शासन आदेशाप्रमाणे विद्यार्थ्यांनी ढोलताशांच्या तालावर कवायत केली.कार्यक्रमाचे संचालन श्री. एस. एच.सुतार सरांनी केले आणि आभार प्रदर्शन मुख्याध्यापक बापूसाहेब श्री. ए. बी.चौधरी सर यांनी केले.

