सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सभा संपन्न!
1 min read

सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सभा संपन्न!

Loading

सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सभा संपन्न!

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेची 50 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष डॉ.चंद्रकांत बाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत संपन्न झाली. संस्थेचे सुवर्ण वर्ष असल्याने अनेक योजना यावर्षी राबवण्याचा निर्णय या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. संस्थेच्या सभासदांना आधुनिक सेवा सुविधा देता यावी यासाठी सारस्वत इन्फोटेक कंपनीची संगणक सॉफ्टवेअर प्रणाली संस्थेने स्वीकारली आहे त्यामुळे सभासदांना अद्यवत माहिती घरबसल्या प्राप्त होते. तसेच मोबाईल ॲपद्वारे विविध माहिती सभासदांना देण्यात येत आहे.
विषय पत्रिकेतील सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले . अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभा पार पडली. सभेचे वैशिष्ट्य म्हणजे संस्थेने दादर या मध्यवर्ती ठिकाणी सेकंडरी भवन नावाची एक इमारत घेण्याचे ठरवले व सभेने त्याला एकमताने मंजुरी दिली हा संस्थेतील सुवर्ण महोत्सवी वर्षातील सुवर्णक्षण आहे याबद्दल सर्व सभासदांचे अभिनंदन करून त्यांचे आभार संचालक मंडळाने मानले तसेच. सोमवार दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी सर्व सभासदांच्या बँक खात्यावर त्यांचा लाभांश व संचयनिती व्याज जमा होईल.यामुळे गणेशोत्सव काळात खरेदी करण्यासाठी सभासदांना आर्थिक सहाय्य होईल. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धा, आरोग्यासाठी मेडिक्लेम योजना, पर्यटकांसाठी आर्थिक मदत तसेच विविध कर्ज योजनेत भरघोस वाढ करून सभासदांना अल्प दरात कर्ज देण्याची तरतूद या सभेत करण्यात आली. सदस्यांना ग्राहपयोगी वस्तू घेण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था करण्याचे नियोजन लवकरच करण्यात येणार आहे अशी घोषणा संचालक मंडळांनी या सभेत केली. सभासद पाल्य शैक्षणिक बक्षीस योजना, आदर्श शिक्षक व शिक्षकेतर पुरस्कार, सभासदांच सन्मान, सभासदांना पर्यटन व विश्रामगृह, शाखा विस्तार, सभासद संख्या वाढवणे, सहकार शिक्षण व प्रशिक्षण, जीवन सुरक्षा योजना अशा अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली व अनेक योजनांही बहुमताने मंजूर करण्यात आल्या.

विना सहकार नाही उद्धार” या म्हणीचा अर्थ आहे की, एकमेकांना मदत केल्याशिवाय किंवा सहकार्य केल्याशिवाय कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नाही. समाजाच्या, कुटुंबाच्या किंवा कोणत्याही संस्थेच्या प्रगतीसाठी सहकार (सहकार्य) खूप महत्वाचे आहे.
विना सहकार नाही उद्धार यासाठी संचालक मंडळ कटीबध्द असेल. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी, आर्थिक स्थेंर्य, आरोग्यासाठी ही संस्था वचनबद्ध असेल असे मत अध्यक्ष डॉ. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *