एम.एल.म्हात्रे व्यवसायिक महाविद्यालयात टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.
1 min read

एम.एल.म्हात्रे व्यवसायिक महाविद्यालयात टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

Loading

एम.एल.म्हात्रे व्यवसायिक महाविद्यालयात टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

ठाणे : कल्याण( मनिलाल शिंपी)
एम.एल.म्हात्रे व्यवसायिक महाविद्यालयात प्राचार्य गोरक्षनाथ तरे यांच्या अध्यक्षतेखाली व प्राचार्य सचिन ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत इंग्रजी राजवटीतील असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी इंग्रजी भाषा प्रमुख डॉ. आर आर कसबे यांनी लोकमान्य टिळकांनी केलेल्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सांगत राष्ट्रपुरुषांच्या कार्यावर प्रकाश टाकला.तसेच प्राचार्य तरे यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.क्रीडा विभाग प्रमुख डॉ.प्रा.मनिलाल शिंपी यांनी लोकमान्य टिळकांच्या बाणेदार स्वभावाचे विचार मांडताना सांगितले की ,प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या देशाचा विकास,आणि देशाचे संरक्षण करण्यासाठी टिळकांचा आदर्श समोर ठेवावा, तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या काव्यलेखातून व साहित्यातून केलेल्या सामाजिक प्रबोधनाचा लौकिक अंगिकारावा असे आव्हान केले.
यावेळी कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.हर्षद शेट्टे यांनी केले
यावेळी महाविद्यालयातील वरिष्ठ प्रा. आर. आर. कसबे, बी.एम.एस.विभाग प्रमुख प्रा.हर्षद शेट्टे, कॉमर्स विभागाचे प्रमुख प्रा.विशाल सोनवणे,अर्थशास्र विषय प्रमुख प्रा.मयुरेश दळवी,प्राध्यापिका ऐश्वर्या चव्हाण, प्रा. मनिषा यादव,कार्यालयीन प्रमुख प्रा.रूपेश तरे,प्राचार्य सचिन ठाकरे यांनी इत्यादी उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मराठी विभाग प्रमुख डॉ.दयानंद कांबळे यांनी केले,व प्राचार्य गोरक्षनाथ तरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *