समरसतेचा नवा मंत्र, नव्या युगाची साहित्यसाधना!  नांदेड येथे २०वे समरसता साहित्य संमेलन – नव्या विचारांचे महामंच
1 min read

समरसतेचा नवा मंत्र, नव्या युगाची साहित्यसाधना! नांदेड येथे २०वे समरसता साहित्य संमेलन – नव्या विचारांचे महामंच

Loading

समरसतेचा नवा मंत्र, नव्या युगाची साहित्यसाधना!

नांदेड येथे २०वे समरसता साहित्य संमेलन – नव्या विचारांचे महामंच

नांदेड प्रतिनिधी
येत्या 2 आणि 3 ऑगस्ट 2025 ला नांदेड येथे आयोजित ‘समरसता साहित्य संमेलन’ समरसता साहित्याला नवी दिशा देणारे ठरणार आहे यात काही शंका नाही. नांदेड शहराने ‘धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, वांङयीन’ क्षेत्रात नेतृत्व करण्याइतपत स्पृहनियकार्य केलेले आहे. याच शहरात 20 वे समरसता साहित्य संमेलन आयोजित हाेत आहे हा दुग्धशर्करा योग आहे. हा एक साहित्यिकांचा कुंभमेळाच आहे. या कुंभमेळ्यात आपापल्या ‘वाङमयीन’ क्षेत्रात योगदान देणारे ऋषीमूनी येणार आाहेत. या पावन भूमित आपण सर्वांनी पूर्ण वेळ उपस्थित राहून आपलाही सहभाग नाेंदवावा असे मनापासून आम्हास वाटते. कारण हा परिवर्तनाचा काळ आहे. 21 व्या शतकाचा एक चतुर्थांश भाग लवकरच संपत असून आपण स्वातंत्र्याच्या शतकाेत्तरी महाेत्सवाकडे जात असतांना ‘नव्वदाेत्तरी साहित्य निश्चितच नव्या विचारांना जन्माला घालेल’ असा आम्हा विश्वास असून नव्या परिवर्तनाला दिशा देणार्या नवप्रतिभा निर्माण हाेतील. त्यादृष्टीनेच कार्यक्रमांची रूपरेखा आखलेली आहे.
समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ‘पद्मश्री नामदेव कांबळे’ सिद्धहस्त लेखक आहेत. साहित्य अकादमीने गाैरविलेले कादंबरीकार आहेत. कथा, कविता, नाटक, वैचारिक, वाङ्मयीन क्षेत्रात त्यांची लेखणी सहज संचार करते. त्यांचे मार्गदर्शन नव्या साहित्य प्रतिभांना आणि ज्येष्ट कार्यकत्यांना निश्चितच लाभकारी असेल. ह्या सुवर्ण संधीचा लाभ आपण घ्यावा असे आम्हास वाटते.
नव्वदाेत्तरीने खाऊजा संस्कृती निर्माण केली. सर्वच क्षेत्रात खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण यांनी मानवी जीवन व मूल्यांची दिशाच बदलवून टाकली. नवी जगण्याची आव्हाने पेलण्यास नवी पीढी कितपत समर्थ आहे? या प्रश्नाचे उत्तर याच संमेलनात भेटणार आहेत. ‘जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून अथवा पुरुन टाक’ ही स्थिती निर्माण हाेऊन नव्या इले्नट्राॅक माध्यमाने नवे प्रश्न निर्माण केले ? त्या प्रश्नाचा शाेध घेण्यासाठी या संमेलनातील ‘वक्तागण’ सज्ज झाले आहेत. त्यातून निश्चितच समरसता साहित्याची नव्याने परिभाषा, मांडणी हाेईल अशी अपेक्षा आहे. ह्या आमच्या अपेक्षा पूर्तीसाठी आपण यावे असे आवाहन आम्ही करताे.
आमचा देश स्वतंत्र हाेऊन 75 वर्षे उलटलीत तरी स्वातंत्र्याची गाेड फळे चाखायला मिळाली नाहीत. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार लाेक करू लागले. समता दूरच राहिली. न्याय दूरापास्त झाला. ‘असत्य मेव जयते !’ अशी दशा झाली. जुन्या-रूढी, जिर्ण परंपरांच्या बेड्या, दिवसागणिक अधिक बळकट झाल्या. राममंदिर झाले परंतू ‘रामराज्य’ कुठाय? न्याय ‘गहाळ’ हाेतांना दिसताे. कल्यणकारी राज्याची संकल्पना धुळीस मिळाली. जातीपातीच्या, पंथ, धर्माच्या भिंती अधिक भक्कम हाेत चालल्या. माणसापेक्षा पैसा श्रेष्ठ झालाय. स्त्रीयांवर अत्याचार, बलात्कार, राजकीय अनैतिकता, खून, अशा अस्वस्थ करणार्या गाेष्टींचा साहित्यकांच्या संवेदनशील मनावर हाेतात. त्यांचे सादपडसाद कलाकृतीतून उमटतात. मानवी मूल्ये पायदळी तुडवून माणूसकीचा गळा कापणार्या घटना नष्ट करून दया, करुणा, प्रेम, बंधुभाव, नैतिकता, समता, समरसता आदी मूल्यांचा पुरस्कार करणार्यां कलाकृती तयार व्हाव्यात यासाठी विचारमंथन व्हावे असे समरसता साहित्य परिषदेला वाटते म्हणूनच या समरसता साहित्य संमेलनाचे औचित्य आहे.
‘बंधुत्वाचे हवे आचरण
समतेचा व्यवहार हवा
समरसतेचा मंत्र नवा’
याचा स्वीकार करून आम्ही समरसतेसाठी प्रयत्नशील आहाेत. समरसतेसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण व्हावी ह्यासाठी साहित्यकृती निर्माण व्हावी म्हणून 20 वे समरसता साहित्य संमेलन नांदेड येथे आयोजित आपण आपला सहभाग नाेंदवावा ही विनंती समरसता साहित्य परिषद करते आहे. प्रतिसाद द्यावा !
‘जाे जे वांछिल ताे ते लाहाे, सुखिनः सन्तु’ सर्वे हाेवाे.
जे का रंजून गांजून गेले, दुःख तयांचे लयास जावाे
नव्या युगाची नवी घाेषणा, करण्याचा संकल्प हवा’’
समरसतेचा मंत्र नवा.

डॉ.ईश्वर नंदपुरे
अध्यक्ष
समरसता साहित्य परिषद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *