रोटरी इंटरॅक्ट क्लबतर्फे सार्वजनिक विद्यालय असोदा येथे वह्या वाटप उपक्रम संपन्न*
1 min read

रोटरी इंटरॅक्ट क्लबतर्फे सार्वजनिक विद्यालय असोदा येथे वह्या वाटप उपक्रम संपन्न*

Loading

*रोटरी इंटरॅक्ट क्लबतर्फे सार्वजनिक विद्यालय असोदा येथे वह्या वाटप उपक्रम संपन्न*

जळगाव – सार्वजनिक विद्यालय असोदा येथे रोटरी इंटरॅक्ट क्लबच्या वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप उपक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री .अनिल महाजन होते
प्रमुख पाहुणे रोटेरियन श्री चंदन महाजन, योगेश चौधरी, रितेश जैन मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल.जे.पाटील उपस्थित होते.
रो. चंदन महाजन सरांनी आपल्या मनोगतातून आपल्या आयुष्यात ध्येय महत्त्वाचे असून त्याची सर्वात आधी आपण निश्चिती करावी व आपण आपल्या गुरुजनांचा व आई-वडिलांचा आदर करावा असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता भोळे यांनी केले. सूत्रसंचालन मोहिनी पाटील या दहावीच्या विद्यार्थिनीने केले व आभार प्रदर्शन दक्ष कोल्हे या विद्यार्थ्याने केले. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळाले असून, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकताना दिसून आला. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *