विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी म्युनिसिपल हायस्कूलमध्ये वैद्यकीय शिबिराचे आयोजन,
1 min read

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी म्युनिसिपल हायस्कूलमध्ये वैद्यकीय शिबिराचे आयोजन,

Loading

*म्युनिसिपल हायस्कूल येथे विद्यार्थ्यांची झाली आरोग्य तपासणी.*

भुसावळ – नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे सर्व शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी ट्रामा सेंटरचे वैद्यकीय पथक डॉ. राहुल बडगुजर, फार्मासिस्ट वर्षां मोरे , परिचारिका रोहिणी शिरसाट या पथकामार्फत करण्यात आली सर्वप्रथम शाळेचे ज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे, शालिनी बनसोडे, संध्या धांडे, यांनी पथकाचे पुष्प देऊन स्वागत केले तर नंतर सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनीची आरोग्य तपासणी करण्यात आली व वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय उपचार देण्यात आला. सदर प्रसंगी डॉक्टर राहुल बडगुजर यांनी विद्यार्थ्यांनी सकस आहार खावा कडधान्य, दाळी, फळे यांचा समावेश असावा. व शारीरिक स्वच्छता ठेवावी असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, विद्यार्थीनींनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. प्रदीप साखरे यांनी केले, यशस्वीतेसाठी एस.टी.चौधरी, नाना पाटील, मनोज किरंगे, नरेंद्र राठोड, जे.पी. शिरतुरे, आर. पी. सोनवणे , प्रवीण चौधरी, पुनम देवकर, अरुण नेटके, राजेंद्र बागुल, मंदा मोरे, मनोज चौधरी, आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *