महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेची सन 2025 ते 2030 कालावधी करिता जिल्हा कार्यकारिणी निवड नियोजन सभा 27 जुलै रोजी जळगाव येथे*
1 min read

महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेची सन 2025 ते 2030 कालावधी करिता जिल्हा कार्यकारिणी निवड नियोजन सभा 27 जुलै रोजी जळगाव येथे*

Loading

*महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेची सन 2025 ते 2030 कालावधी करिता जिल्हा कार्यकारिणी निवड नियोजन सभा 27 जुलै रोजी जळगाव येथे*

जळगाव प्रतिनिधी
………………………………………….
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेची 2025-30 या कालावधी करिता जळगाव ॲड हाॅक जिल्हा कार्यकारणी निवड सभा दिनांक 27 जुलै रोजी माध्यमिक पतपेढी जळगाव येथे सकाळी 11.30 वाजता संपन्न होणार आहे.
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद गेल्या सतरा वर्षापासून शैक्षणिक गुणवत्ता व शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने संघर्षरत असणारी संघटना आहे. संस्थापक अध्यक्ष आण्णासो डि.के.अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व समता-बंधुता आणि स्वातंत्र्य या तत्त्वांना प्रमाण मानून संघटनेसाठी अहोरात्र परीश्रम घेणारे संघटनेचे बॅॅकबोन मा.भरत शिरसाठ सर यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाखाली संघटना मागील तीन पंचवार्षिक कालावधीपेक्षा अधिक काळापासून माध्यमिक शिक्षकांसाठी भरीव योगदान देत आहे. “काम हाच आमचा वशिला आणि गुणवत्ता हीच आमची मालमत्ता” या ब्रीद वाक्यानुसार संघटनेने आतापर्यंत आपले कार्य केलेले आहे. प्राथमिक विभागाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष मा. भाऊसाहेब अहिरे व माध्यमिक विभागाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष मा. भरत शिरसाठ सर समर्थपणे पार पाडीत आहेत. कितीही मोठे आव्हान असो, अन्यायग्रस्त शिक्षकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शिक्षकास न्याय मिळवून देणे, हे संघटनेचे धोरण राहिलेले आहे. गेल्या 17 वर्षापासून जळगाव जिल्ह्यामध्ये संघटनेवर अनेक शिक्षकांनी अतोनात प्रेम केले आहे. शिव -फुले -शाहू- आंबेडकर विचार घेऊन संघटनेने समाजामध्ये विचारांची पेरणी केली आहे आणि समतेचे तत्व समाजाला समजावून सांगितले आहे. याचाच परिणाम म्हणून मागील तीन पंचवार्षिक काळात संघटनेमध्ये कोणत्याही पद्धतीचे वाद न होता संघटना अत्यंत सहजपणे आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. शिक्षकांच्या कलागुणांना वाव देणे, शिक्षकांमधील साहित्य मूल्य जोपासणे, शिक्षक साहित्य संमेलन भरविणे, शिक्षकांची पुस्तके प्रकाशित करणे, उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कृत करणे तसेच विद्यार्थी गुणवत्तेचे उपक्रम राबवणे हा सुद्धा समता शिक्षक परिषदेचा एक अविभाज्य भाग राहिलेला आहे. आज महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेमध्ये अनेक साहित्यिक शिक्षक, कलाप्रेमी शिक्षक, गुणवान शिक्षक, प्रचंड कौशल्य प्राप्त असलेले शिक्षक कार्यरत आहेत. अशा गुणवान शिक्षकांची खाण म्हणजे समता शिक्षक परिषद आहे. अशा गुणवान शिक्षकांना महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जळगाव शाखेमध्ये सहभागी होण्याच्या संघटनेमार्फत आव्हान करण्यात आले आहे. जात- धर्म हा भेदभाव बाजूला ठेवून शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, समाजाला समतेच्या मूल्यांच्या माध्यमातून जागृत करणे, शिक्षकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने आंदोलने उभारणे आणि राष्ट्र निर्माणामध्ये आपले योगदान देणे, या विचारांच्या अनुषंगाने ज्यांना -ज्यांना काम करावेसे वाटते,तर त्यांनी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जळगाव शाखेमध्ये सक्रिय व्हावे, असे संघटनेमार्फत कळविण्यात आले आहे .
संघटनेचे राज्य अधिवेशन दिवाळी सुट्ट्यांमध्ये जळगाव येथे नियोजित आहे. त्या पार्श्वभूमीवर दिनांक 27 जुलै 2025 रोजी माध्यमिक पतपेढी जळगाव येथे सकाळी 11:30 वाजता संघटनेची जाहीर सभा मा. भरत शिरसाठ सर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. सदर सभेत 2025 ते 2030 या कालावधी करिता समता शिक्षक परिषद जळगाव जिल्हा ॲड हाॅक कार्यकारणी निवड संदर्भात नियोजन करण्यात येणार आहे. 27 जुलै च्या सभेस उपस्थितीचे आवाहन धनराज मोतीराय, प्रमुख, निवड समिती, रणजीत सोनवणे, ॲड हाॅक कमिटी सदस्य, सौ. छाया बैसाणे, ॲड हाॅक कमिटी सदस्य, मनोज नन्नवरे,ॲड हाॅक कमिटी सदस्य, गणेश बच्छाव, निमंत्रक, उपक्रम विभाग, प्रमोद आठवले, ॲड हाॅक कमिटी सदस्य, प्रविण केदार, निवड समिती सदस्य, भैय्यासाहेब सोनवणे, ॲड हाॅक कमिटी सदस्य, बी.एन.पाटील, ॲड हाॅक कमिटी सदस्य, टि. बी. पांढरे, ॲड हाॅक कमिटी सदस्य, प्रा. मनिषा देशमुख, ॲड हाॅक कमिटी सदस्य, सौ. सरिता वासवानी,ॲड हाॅक कमिटी सदस्य, श्रीमती वर्षा अहिरराव, निमंत्रक, महिला विभाग, अजय भामरे, प्राथमिक विभाग, निमंत्रक, सुधीर महाजन, ॲड हाॅक कमिटी सदस्य,हेमेंद्र सपकाळे, ॲड हाॅक कमिटी सदस्य, सौ. प्रज्ञा तायडे, निमंत्रक प्राथमिक विभाग, अस्लम शेख, निमंत्रक, उर्दू विभाग प्रकाश तामस्वरे, ॲड हाॅक कमिटी सदस्य, सौ.मनिषा ठाकरे, ॲड हाॅक कमिटी सदस्य, शंकर भामेरे, निमंत्रक, टप्पा अनुदान विभाग, सोपान भवरे, ॲड हाॅक कमिटी सदस्य, सुधाकर मोरे, निमंत्रक, मुख्याध्यापक विभाग यांचेमार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *