पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त रंगला दिंडी सोहळा*
1 min read

पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त रंगला दिंडी सोहळा*

Loading

*पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त रंगला दिंडी सोहळा*

अमळनेर प्रतिनिधी

पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन चंद्रकांत भदाणे सर यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा केल्या होत्या. शाळेच्या पटांगणात दिंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन फुगड्या खेळण्यात आल्या पालखी भोवती रिंगण सोहळा करण्यात आला. व पालखी मिरवणूक काढण्यात आली.
प्राचार्या यांनी विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर छोट्या छोट्या विठ्ठल रुक्मिणी बनलेल्या विद्यार्थ्यांकडून विठ्ठलाची आरती करण्यात आली. यामध्ये सर्व विद्यार्थी सहभागी झाले. यावेळी अवघी शाळा विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमली होती. यास पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रज्ञा पाटील मॅडम, कुंजल पाटील मॅडम, उष्कर्षा लोकंक्षी मॅडम,विजय चौधरी सर, उमेश पाटील, राजु पाटील, सखाराम पावरा यांनी प्रयत्न केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *