महिला आयोगाच्या अध्यक्षपदी तृप्ती देसाई यांची निवड व्हावी लाईफलाईन हॉस्पिटलच्या संचालिका अश्विनी पटेल यांची प्रशासनाकडे विनंती
![]()
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी तृप्ती देसाई यांची निवड व्हावी
लाईफलाईन हॉस्पिटलच्या संचालिका अश्विनी पटेल यांची प्रशासनाकडे विनंती
चिंचवड : (प्रतिनिधी, छाया खंदारे)
महिलांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई देसाई यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती व्हावी अशी आग्रही मागणी लाईफलाईन हॉस्पिटलच्या संचालिका अश्विनी पटेल यांनी प्रशासनाकडे केली आहे.
अश्विनी पटेल म्हणाल्या की तृप्तीताई देसाई कोणत्याही सामान्य महिलेचा थेट कॉल रिसीव्ह करून ऐकून घेतात आणि तिच्या समस्यांवर तत्काळ मदतीचा हात पुढे करतात. त्यांचं कार्य केवळ सामाजिक नाही तर मानसिक आधार देणारं आहे. त्यामुळे महिलांना सुरक्षिततेचा आणि विश्वासाचा अनुभव मिळतो. तृप्ती देसाई यांनी महिलांवरील अन्याय,अत्याचार आणि सामाजिक भेदभावाविरोधात अनेकदा निर्भीडपणे आवाज उठवला आहे. महिला धर्मस्थळांतील भेदभाव सामाजिक अन्याय लैंगिक अत्याचार अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी आंदोलन जनआंदोलन आणि मोर्थ्यांच्या माध्यमातून शासन दरबारी महिलांची बाजू ठामपणे मांडली आहे.
त्यांनी शनि शिंगणापूर मंदिर प्रवेश आंदोलन, हाजी अली दरगाह महिलांना प्रवेशासाठी लढा तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर राज्यभर महिला जागृती मोहीम राबवली आहे. समाजातील दुर्बल उपेक्षित व पीडित महिलांसाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे.
त्यांच्या कार्यामुळे अनेक महिलांना न्याय मिळाला असून समाजात महिलांसाठीचा न्यायाचा विश्वास दृढ झाला आहे. त्यामुळे
अशा धाडसी स्पष्टवक्त्या आणि लोकाभिमुख कार्यकर्त्याला महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची संधी दिल्यास, महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने तो ऐतिहासिक निर्णय ठरेल असे मत अश्विनी पटेल यांनी मांडले.

