शिक्षकांच्या खात्यात जमा होणार अर्जित रजा  अनिल बोरनारे यांच्या मागणीवरून शिक्षण उपसंचालकांचे आदेश  मुंबई ठाणे रायगड व पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना लाभ
1 min read

शिक्षकांच्या खात्यात जमा होणार अर्जित रजा अनिल बोरनारे यांच्या मागणीवरून शिक्षण उपसंचालकांचे आदेश मुंबई ठाणे रायगड व पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना लाभ

Loading

शिक्षकांच्या खात्यात जमा होणार अर्जित रजा

अनिल बोरनारे यांच्या मागणीवरून शिक्षण उपसंचालकांचे आदेश

मुंबई ठाणे रायगड व पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना लाभ

मुंबई (प्रतिनिधी) सुट्टी काळात वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांच्या खात्यात अर्जित रजा जमा होणार असून मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष व भाजप राज्य कार्यकारिणी निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांच्या मागणीवरून मुंबई विभाग शिक्षण उपसंचालकांनी आदेश निर्गमित केले आहे
या निर्णयाचा फायदा मुंबईतील उत्तर पश्चिम दक्षिण शिक्षण निरीक्षक तसेच ठाणे रायगड व पालघर जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयंतर्गत असणाऱ्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शेकडो शिक्षकांना होणार आहे
राज्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण झाले या प्रशिक्षणात हजारो शिक्षक सहभागी झाले होते. दीर्घ सुट्टीच्या काळात प्रशिक्षण अथवा इतर कामासाठी शिक्षकांना बोलावल्यास त्या दिवसांची अर्जित रजांची नोंद शिक्षकांच्या सेवा पुस्तिकेत केली जाते तथापि अनेक ठिकाणी अशा नोंदी केल्या जात नसल्याच्या तक्रारी अनिल बोरनारे यांच्याकडे शिक्षकांनी केल्या होत्या यावर बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालक यांना निवेदन देऊन शिक्षकांना अर्जित रजा मिळावी व तशा नोंदी करण्यात याव्यात अशी मागणी केली होती ही मागणी मान्य करीत शिक्षण उपसंचालकांनी आदेश निर्गमित केले
या आदेशात “ज्या प्राथमिक/माध्यमिक शिक्षकांनी वरिष्ठ वेतनश्रेणी/निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण (गृहपाठासह) पुर्ण केल्यामुळे त्यांना सुट्टी उपभोगण्यात प्रतिबंध झाला असेल त्यांच्या खाती अर्जित रजा जमा करण्याबाबत महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम क्र. १६ (१८) (अ) मधील वरील नियमानुसार कार्यवाही करावी” असे आदेश दिल्याने या निर्णयाचा फायदा मुंबईतील उत्तर पश्चिम दक्षिण शिक्षण निरीक्षक तसेच ठाणे रायगड व पालघर जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयंतर्गत असणाऱ्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शेकडो शिक्षकांना होणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *