किशोरी विकास प्रकल्प”चा प्रेरणादायी प्रवास *सेवा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेल्या किशोरी विकास प्रकल्पाने १०० वर्गांचा टप्पा गाठला आहे!*
![]()
– “किशोरी विकास प्रकल्प”चा प्रेरणादायी प्रवास
*सेवा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेल्या किशोरी विकास प्रकल्पाने १०० वर्गांचा टप्पा गाठला आहे!*
*ठाणे : कल्याण(मनिलाल शिंपी)*
*सेवा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेल्या किशोरी विकास प्रकल्पाने १०० वर्गांचा टप्पा गाठला आहे!* महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतील १०० गावं आणि वस्त्यांमध्ये सध्या २५०० मुलींचा सहभाग हे या प्रवासाचं जिवंत उदाहरण आहे. मात्र हे केवळ आकडे नाहीत, तर हजारो आयुष्यांमध्ये सकारात्मक बदल घडवणारा दीपस्तंभ आहे* . “किशोरी विकास प्रकल्प”चा प्रेरणादायी प्रवास आहे.
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतील १०० गावं आणि वस्त्यांमध्ये सध्या २५०० मुलींचा सहभाग हे या प्रवासाचं जिवंत उदाहरण आहे. मात्र हे केवळ आकडे नाहीत, तर हजारो आयुष्यांमध्ये सकारात्मक बदल घडवणारा दीपस्तंभ आहे.
आज मागे वळून पाहताना ६ मे २०१९ ची ती सुरुवात आठवते. किशोरजींच्या एका विश्वासपूर्ण फोन कॉलमुळे मी या प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारली – किशोरी विकास म्हणजे नेमकं काय, कुणासाठी, कसं करायचं – काहीच ठाऊक नव्हतं! पण न थांबता, शिकत शिकवत, विश्वासाला सार्थ ठरवत ही वाटचाल सुरू केली आणि सेवा सहयोग फाउंडेशनशी माझं नाळ जोडणं घडलं.
पुण्याच्या यशस्वी मॉडेलनंतर मुंबई विभागातही प्रकल्प राबवण्याचा संकल्प घेतला. जुलैमध्ये पहिला किशोरी वर्ग सुरू झाला – ग्रामीण, शहरी, वस्त्या आणि शाळा यातील विविधता जपली. अनेक महिने अभ्यास करून सत्रं तयार केली, सतत मुलींसोबत राहून त्यांच्या गरजा समजून घेतल्या.
पहिल्या सहा वर्गांपासून ते आज १०० वर्गांपर्यंतचा प्रवास – एक टीमवर्कचा जयघोष आहे!
प्रत्येक यशस्वी टप्प्यामागे आहे – आपल्या समन्वयिका, किशोरी प्रमुख, प्रकल्प समन्वयक, पूर्णवेळ व अर्धवेळ कार्यकर्त्या आणि स्वयंसेवक यांचा अथक सहभाग.
संजयजींच्या मार्गदर्शनात एक वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांच्या त्या सकारात्मक शब्दांनी अजून उर्जा मिळाली – “तुला तुझ्या अपेक्षेप्रमाणे काम करता येतंय का?” या एका प्रश्नात संपूर्ण प्रकल्पाचा आत्मविश्वास होता.
आज १०० वर्ग म्हणजे केवळ २५०० किशोरी नव्हे – २५०० कुटुंबं सेवा सहयोगशी जोडले गेली आहेत.
या यशाचा खरा पाया आहे KVP टीम – आणि टीम च एक pec नावाचं त्रिकुट … त्रिकुटाच्या – डॉ. भावना ताई, डॉ. अस्मिता ताई आणि वर्षा ताई – मार्गदर्शनाशिवाय ही वाटचाल पूर्ण झाली नसती.
आज KVP ची टॉप १० समन्वयक कार्यकर्ती ही प्रकल्पाची धुरा समर्थपणे वाहत आहेत. कोणी म्हणतं – “१० महिला एकत्र येऊन काम करू शकत नाहीत!” पण KVP टीमने हे विधान चुकीचं ठरवलंय.
*स्वामी विवेकानंद म्हणत* – “मला १०० तरुण द्या, मी जग बदलून टाकीन!”
आज KVP मध्ये अशाच १०० तरुणी तयार झाल्या आहेत, ज्या त्यांच्या गावात बदल घडवण्यासाठी सज्ज आहेत.
KVP अभ्यासक्रमाला S.N.D.T. विद्यापीठाची मान्यता, वैविध्यपूर्ण उपक्रम, सशक्त सत्र आणि मूल्याधिष्ठित दृष्टिकोनामुळे प्रकल्प अजून आकर्षक ठरतो आहे.


*जेव्हा इतर संस्थांचे कार्यकर्ते म्हणतात –*
“सेवा सहयोगचा किशोरी विकास प्रकल्प अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावी आहे” –
तेव्हा आपल्या टीमच्या प्रत्येक सदस्याच्या अंगावर शहारे येतात, अभिमानाची लहर उसळते.
या रंगमंचावर दिसणाऱ्या महिलांइतकाच पडद्यामागे असलेल्या अनेकांचा सहभागही अमूल्य आहे –
किशोरजींचा ,सुधीर जी चा व इतर सस्थापकांचा विश्वास, मणेर सरांची साथ , रमेशजींची सोबत, संदेशची सृजनशीलता, अक्षयचं बीजपेरण, आकाश दादाचं आर्थिक व्यवस्थापन, अविजित, राजेंद्र, अभिषेक, अभिनंदनजींची प्रेरणा, अनिकेतचं सोशल मीडिया योगदान, आणि मै हू ना म्हणणारा योगेश,मी आहे मी येतो म्हणणारे रवी जी
आज या यशाचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे – रविद मिठे सरांच्या मार्गदर्शनाने हा प्रवास अधिक वेगाने, अधिक व्यापक होईल.
👉 किशोरी विकास प्रकल्प – केवळ सशक्तीकरण नव्हे, तर एक परिवर्तनाची चळवळ आहे!
या वाटचालीत प्रत्येक सहभागी, प्रत्येक कार्यकर्त्याचं मनापासून अभिनंदन आणि आभार!
पुढच्या १०० चा संकल्प घेऊन… सेवा सहयोग फौंडेशनची यशस्वी वाटचाल सुरूच आहे.असे वृत्तांकन सेवासहयोग फाउंडेशनच्या केशरी विकास प्रकल्पाच्या मार्गदर्शिका आरती नेमाने यांच्याकडून देण्यात आले आहे.

