कुंडमळा पूल दुर्घटनेचा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हें यांच्याकडून आढावा; जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारकडून**
1 min read

कुंडमळा पूल दुर्घटनेचा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हें यांच्याकडून आढावा; जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारकडून**

Loading

 

**कुंडमळा पूल दुर्घटनेचा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हें यांच्याकडून आढावा; जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारकडून**

पुणे.दि.१६: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याच्या दुर्घटनास्थळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी सकाळी भेट देऊन बचाव कार्याचा आणि परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जखमींना रुग्णालयात भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली.

इंदोरी गावाजवळील कुंडमळा येथील पूल कोसळल्याच्या घटनेची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, उपसभापती कार्यालयातून चार जणांचे पथक जखमींना दाखल केलेल्या रुग्णालयात पाठवून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकारकडून केला जाईल. अनेक जखमी हे असंघटित क्षेत्रात काम करणारे असल्याने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत सर्वेक्षण करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

**धोकादायक पुलांवर तातडीने उपाययोजनेच्या सूचना**
डॉ. गोऱ्हे यांनी राज्यातील धोकादायक पुलांबाबत संबंधित मंत्र्यांचे लक्ष वेधले असून, नाशिक, जळगाव, धुळे आणि पुणे शहरातील पुलांची माहिती दिली आहे. पुणे महापालिकेसोबत सकाळी तातडीची बैठक घेऊन कोंडवे-धावडे येथील धोकादायक पूल आणि शहर तसेच जिल्ह्यात पाणी साठणाऱ्या ठिकाणांवर उपाययोजना करण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिल्या आहेत.

**नागरिकांना आवाहन**
राज्यातील धोकादायक पुलांची माहिती नागरिकांनी आणि माध्यमांनी समोर आणावी, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले. याबाबत आगामी विधिमंडळ अधिवेशनात पाठपुरावा करून योग्य उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *