सार्वजनिक विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत व पाठ्यपुस्तक वितरण
1 min read

सार्वजनिक विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत व पाठ्यपुस्तक वितरण

Loading

सार्वजनिक विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत व पाठ्यपुस्तक वितरण

सार्वजनिक विद्यालय आसोदा येथे नवीन शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन संस्थाध्यक्ष अनिल महाजन मुख्या. डॉ.मिलिंद बागुल पर्यवेक्षक लालसिंग पाटील व सर्व शिक्षकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले संस्थाध्यक्ष अनिल महाजन यांच्या हस्ते शालेय पुस्तके देण्यात आले शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांना जिलेबी देऊन गोड करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना अनिल महाजन यांनी स्पर्धा परीक्षेकडे या वयापासूनच अभ्यासाला सुरुवात करावी आणि आपलं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावे हे सांगितले तसेच डॉ.मिलिंद बागुल यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील शिस्तीचे महत्वं आणि प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत कसं पुढे जावं हे समजावून सांगितले याप्रसंगी सूत्रसंचालन शुभांगीनी महाजन तर आभार मंगला नारखेडे यांनी मानले. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *