पाडळसरे धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश झाल्याने आ. अनिल पाटलांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा
1 min read

पाडळसरे धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश झाल्याने आ. अनिल पाटलांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा

Loading

पाडळसरे धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश झाल्याने आ. अनिल पाटलांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा

अमळनेर-निम्न तापी पाडळसरे धरणाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सिंचाई योजनेत समावेश झाल्याने माजी मंत्री तथा आ. अनिल पाटलांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सदर धरणास राज्य शासनाची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविल्यानंतर केंद्राकडे सतत यशस्वी पाठपुरावा करून धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश करण्याचा शब्द खरा करून दाखविल्याने आमदार अनिल पाटील यांच्या नावाचा जोरदार जयघोष यावेळी करण्यात आला.कार्यालयाबाहेर फटाक्याची आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी ठेका देखिल धरला.एकमेकांना पेढे देऊन आनंद व्यक्त करण्यात आला.यावेळी माजी जि प सदस्या सौ जयश्री अनिल पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते,ग्रामिण लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.,यावेळी आमदारांनी अवर्षणप्रवण भागाला केंद्र आणि राज्य शासनाने न्याय दिल्याने येथील जनता कायम ऋणी राहील असे सांगत सर्वांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *