जागतिक बालकामगार विरोधी दिवशी जनजागरण अभियान
1 min read

जागतिक बालकामगार विरोधी दिवशी जनजागरण अभियान

Loading

जागतिक बालकामगार विरोधी दिवशी जनजागरण अभियान

अमळनेर प्रतिनिधी

१२ जून जागतिक बालकामगार विरोध दिवस जळगाव जिल्ह्यात राबवला जात असून जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन
Just Rights for Children
या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत नेटवर्कच्या मार्गदर्शन नुसार आधार बहुउद्देशीय संस्था शासनाला सहकार्य करत आहे.
अमळनेर येथील प्रांत अधिकारी नितीनकुमार मुंडावरे,तहसीलदार रूपेशकुमार सुराणा,नगर परिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी जनजागृती साठी बाल कामगार विरोधी संदेश स्टिकरचे अनावरण करण्यात आले.
तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी प्रत्येक व्यावसायिक दुकाने,बाजार पेठ,हॉटेल, ढाबा, मॉल, किरणा शॉप अशा प्रत्येक ठिकाणी स्टिकर लावण्यात यावे तसेच बाल कामगार आढळून आल्यास त्यांची माहिती देण्यात यावी असे निर्देश केले असून अमळनेर शहरातील फॅमिली रेस्टॉरंट,मेडिकल,जनरल स्टोअर्स,टी कॉर्नर सेंटर, ज्युस सेंटर, लेडीज शॉप हॉटेल्स अशा ठिकाणी स्टिकर्स लावण्यात आले.तसेच बाल कामगार विषयी माहिती देण्यात आली.

सदर अभियान मध्ये आधार संस्थेचे अध्यक्ष डॉ.भारती पाटील,संचालक रेणू प्रसाद , जिल्हा प्रकल्प समन्वयक आनंद पगारे,मोहिनी धनगर,समाधान अहिरे, स्वयंसेवक भावेश मराठे,राहुल पवार सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *