राजस्थान दर्जी छिपा समाजाचे संत नामदेव एकसंघात स्वागत आहे.: ॲड.महेश ढवळे. महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष “ॲड.महेशजी ढवळे” यांचे कार्य संपूर्ण शिंपी समाजासाठी अभिमानास्पद आहे.: डॉ.मनिलाल शिंपी.
![]()
राजस्थान दर्जी छिपा समाजाचे संत नामदेव एकसंघात स्वागत आहे.: ॲड.महेश ढवळे.
महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष “ॲड.महेशजी ढवळे” यांचे कार्य संपूर्ण शिंपी समाजासाठी अभिमानास्पद आहे.: डॉ.मनिलाल शिंपी.
मुंबई( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष “ॲड.महेशजी ढवळे”यांची मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मणिलाल शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली आज राजस्थान दर्जी छिपा समाजाचे सचिव नटवर वर्मा यांच्यासह के.के.वर्मा( भाईंदर), लादुराम दुधकर(बोरिवली), धनराज गोठवाल( चेंबूर), अशोक निकुंभ( शहाड) यांनी भेट घेऊन अभिनंदन केले. व संत नामदेव महाराज एकसंघातर्फे संत शिरोमणी यांच्या 675व्या समाधी सोहळा एकत्रित आयोजित करण्याबाबत सामाजिक व शासकीय विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी संत नामदेव एकसंघाचे सचिव रूपेश धानके यांनीही राजस्थान दर्जी नामदेव समाज बांधवांचे स्वागत केले. संत नामदेव एकसंघाचे अध्यक्ष ॲड.महेशजी ढवळे साहेब यांनी शिंपी समाजातील प्रत्येक पोटजातीमधील नामदेवाचे भक्त, शिंपी बांधवांना एकत्र करून एकसंघ स्थापन करण्यात आला आहे व समाजातील सर्व घटकांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा, शासनाला शिंपी समाजाचे एकात्मतेचे महत्व पटवून देऊन संत शिरोमणी नामदेव महाराज महामंडळ स्थापन करण्यात आले असून या महामंडळाचा माध्यमातून सर्व समाजबांधवांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,अन्न आयोगाचे अध्यक्ष ॲड.महेश ढवळे यांनी केले. व राजस्थान दर्जी नामदेव समाज बांधवांचे संत नामदेव महाराज एकसंघात स्वागत केले.यावेळी मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख, आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ.मनिलाल शिंपी यांनी सर्वांचा परिचय करुन देतमहाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष “ॲड.महेशजी ढवळे” यांचे कार्य संपूर्ण शिंपी समाजासाठी अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन डॉ. मनिलाल शिंपी यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले.
.

