रमाईच्या त्यागामुळेच बहुजनांच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला आहे*. डॉ.मिलिंद बागुल
1 min read

रमाईच्या त्यागामुळेच बहुजनांच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला आहे*. डॉ.मिलिंद बागुल

Loading

*रमाईच्या त्यागामुळेच बहुजनांच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला आहे*.
डॉ.मिलिंद बागुल

( धरणगाव) समृद्ध जीवनाची वाटचाल महापुरुषांनी केलेल्या कार्यात असून त्यांनी आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून पिढी जात कल्याणाचा मार्ग आपणास प्राप्त करून दिला असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात रमाईंचे स्थान अतिउच्च असून , रमाईंनी आपल्या जीवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाला, ज्ञानाला अधिकाधिक बळ देऊन त्यागाची परिसीमा गाठून बहुजनांसाठी विचार करणाऱ्या महापुरुष डॉ बाबासाहेबांना जी साथ दिली वेळप्रसंगी कुटुंबाच्या साऱ्या जबाबदाऱ्या सांभाळत, आत्मसन्मानाची स्वाभिमानाची अस्पृश्यतेविरुद्धची लढाई लढण्याकरता बाबासाहेबांना सतत जबाबदारीने साथ देऊन एक इतिहास निर्माण करणाऱ्या रमाईंच्या त्यागामुळेच बहुजनांच्या कल्याणाचा प्रगतीचा समृद्ध असा आलेख उंचावत गेला असल्याचे मत डॉ. मिलिंद बागुल यांनी धरणगाव येथील गौतम नगरातील बौद्ध विहारा तर्फे रमाई स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय शिक्षिका उषाताई बाविस्कर होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीस रुक्मिणीबाई बागुल यांच्या हस्ते रमाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रसंगी सुनीता गाढे,सुशीला केदार यांनी मनोगत व्यक्त केले
रोशनी सोनवणे, भावना सोनवणे, पूर्वी सोनवणे, कोमल सोनवणे, अर्पिता गायकवाड यांनी रमाईच्या जीवनावर आधारित गाणी गायली. कबीर पारेराव, गौरव सोनवणे, सम्राट सोनवणे, लवकुमार सोनवणे, अश्विन अहिरे,नम्रता बैसाणे यांनी रमाई विषयी आपली मनोगत व्यक्त केलीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *