“पत्रकारितेत समाजसेवेची अमूल्य चमक – संजय बाप्पू देशमुख यांचा जीवनप्रवास”
![]()
“पत्रकारितेत समाजसेवेची अमूल्य चमक – संजय बाप्पू देशमुख यांचा जीवनप्रवास”
३ मे १९६६ ला निंबा या साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आदरणीय संजय माणिकराव देशमुख (निंबेकर) यांचा आज वाढदिवस आहे. बालपणापासूनच लेखन आणि पत्रकारितेची आवड जपणाऱ्या संजय बाप्पूंनी ‘वृत्तसंजीवनी’ या साप्ताहिकातून कारकीर्दीची सुरुवात केली आणि नंतर ‘विश्वप्रभात’ या साप्ताहिकाद्वारे पत्रकारितेत आपले वेगळे स्थान निर्माण केले.
त्यांनी ग्रामीण भागातील समस्या, सामाजिक व राजकीय विषयांवर धारदार लेखन करत शहाणपणाने आपली धार उमटवली. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या सहवासात, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी विशेष योगदान दिले. ‘कंसांडी’ या आध्यात्मिक त्रैमासिकाचे संपादन करत तत्त्वज्ञान व समाजसेवेची नवी दृष्टी अंगीकारली.
मुंबईतील मंत्रालयीन कामकाजात स्वकीय सचिव म्हणून त्यांनी आदरणीय डी. वाय. पाटील यांच्यासोबत घनिष्ट सहकार केला. पत्रकार महासंघाचं नेतृत्व करत, दोन दशकांहून अधिक काळ सहकार क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करून ‘मानवधर्म’ पुरस्कार प्राप्त केला. निंबा गावात उपसरपंच म्हणून गावाच्या व सामाजिक विकासासाठी तितकाच उत्साहाने कार्य केले.
कोरोना काळात स्थापना केलेल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची महाराष्ट्रात व देशातील अनेक भागांमध्ये भक्कम उभारणी केली. संघटनेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिरे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, गरजूंना शालेय साहित्याचे वाटप अशा सेवा कार्यांचा प्रत्येकी भाग घेतले.

सतत पत्रकार महासंघाच्या नावाने व्यस्त असलेल्या, भ्रष्टाचाराविरुद्ध ठाम भूमिका मांडणाऱ्या, समाजातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी, वकील, डॉक्टर, साहित्यिक यांना समोर घेऊन संघटित केलेल्या संजय बाप्पू देशमुख यांच्या कार्यशैलीला आम्ही सलाम करतो.
त्यांच्या ऊर्जा, समर्पण आणि नेतृत्वाखाली लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाला नवनवीन गगनचुंबी शिखरे गाठू दे, ही सदिच्छा व्यक्त करतो. या शुभदिनी त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि आनंदमय जीवन लाभो, अशी मनापासून प्रार्थना.
दोन शब्द आपल्यासाठी..
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागाराला
किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढील आयुष्य सुखसमृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..
**शुभेच्छुक**
ईश्वर आर महाजन
सदस्य, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ
संपादक-मराठी लाईव्ह न्युज
9860352960

