शिंपी समाज विश्वस्थ मंडळातर्फे समाजरत्न मनिलाल शिंपी यांचा सत्कार.*
![]()
*शिंपी समाज विश्वस्थ मंडळातर्फे समाजरत्न मनिलाल शिंपी यांचा सत्कार.*
कल्याण: ठाणे( प्रतिनिधी)
मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांना लक्ष्मी शिक्षण संस्था मुंबईचे शिक्षक नेते श्री. शिवाजी शेंडगे सर यांचा संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध उद्योजक,दानशूर व्यक्तिमत्व मा.नानजीभाई खिमजीभाई ठक्कर यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रभर आदिवासी भागातील गरजू विद्यार्थी व शेतमजूर ऊसतोड कामगार वीट भट्टी कामगार अशा गोरगरीब लोकांना ब्लांकेट, चादरी, कपडे, शाळेच्या सर्व वस्तू, व प्रत्येक रविवारी मिष्टान्न भोजन व शिंपी समाज बांधवांना १२५ च्या वर मशिनी वाटप, अशा कार्याची दखल घेऊन त्यांना समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व विद्यमान विश्वस्त श्री.विजू नाना बिरारी व मध्यवर्ती संस्थेचे कला सांस्कृतिक विभाग उपप्रमुख श्री.रविंद्र नेरपगार मध्यवर्ती संस्थेचे जिल्हा संघटक विजय खैरनार तसेच मध्यवर्तीचे आंतरराष्ट्रीय संघटक श्री.विजय निकम कल्याण शिंपी समाज सचिव श्री.अरविंद शिंपी यांच्या हस्ते त्यांचा कल्याण येथे सत्कार करून अभिनंदन केले.

