राजभवन येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णनजी आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची महत्त्वाची भेट**
![]()
**राजभवन येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णनजी आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची महत्त्वाची भेट**
आज राजभवन, मुंबई येथे महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल मा. श्री. सी.पी. राधाकृष्णनजी यांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छ भेट घेतली. या भेटीदरम्यान उच्च व तंत्र शिक्षण विभागातील विविध महत्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
राज्यपालांनी शिक्षण क्षेत्रातील सुधारणा आणि नवोन्मेषाची आवश्यकता यावर विशेष लक्ष केंद्रीत केले, तर मंत्री पाटील यांनी लवकरात लवकर कार्यान्वित करावयाच्या योजना व उपक्रमांच्या पुढाकारावर प्रकाश टाकला.
या संवादातून शैक्षणिक क्षेत्रात उत्तम विकास साधण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे, जे विद्यार्थ्यांच्या गुणात्मक शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

